Next
सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
BOI
Saturday, February 16, 2019 | 03:48 PM
15 0 0
Share this article:

पुणे : येथील ‘वंदे मातरम्’ संघटनेतर्फे शहरातील सर्वपक्षीय राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘छत्रपती करंडक २०१९’ या नावाने ही स्पर्धा घेतली जाणार असून अशी स्पर्धा घेण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले आहे.

१८ फेब्रुवारीला डेक्कन येथील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र याठिकाणी आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि ‘येलो’ फेम गौरी गाडगीळ हिच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी चार या वेळात हा कार्यक्रम होणार असून यादरम्यान विविध पक्षाचे दिग्गज आणि इतर तज्ज्ञ मंडळी उपस्थित स्पर्धकांना अनुभवाच्या टिप्स देणार आहेत. 

राजकारणात असो वा इतर क्षेत्रात, एक गोष्ट अशी जाणवते, की कार्यकर्ते काम आणि इतर जबाबदारी उत्तमपणे सांभाळतात. परंतु केवळ वृक्तृत्वाच्या अभावी आणि व्यासपीठाच्या भीतीमुळे हे कार्यकर्ते मागे राहतात. हे लक्षात घेऊन ‘वंदे मातरम्’ संस्थेच्या वतीने छत्रपती करंडक या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

भाजपा, शिवसेना, काँग्रेस आय, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षांबरोबरच विविध संस्था, गणेशोत्सव मंडळ यांचे युवा कार्यकर्ते या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यासंबंधी अधिक माहितासाठी ९८९०७ ९८९०२ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search