Next
महाबँकेच्या कार्यकारी संचालकपदी हेमंतकुमार टम्टा
BOI
Wednesday, January 02 | 12:51 PM
15 0 0
Share this story

हेमंतकुमार टम्टापुणे : सर्वात जुन्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये कार्यकारी संचालकपदी हेमंतकुमार टम्टा यांची नियुक्ती झाली आहे. नुकतीच त्यांनी ३१ डिसेंबर २०१८ रोजी या पदाची सूत्रे हाती घेतली. तीन वर्षांच्या कालावधीसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 
१९८५ मध्ये परिवीक्षा अधिकारी म्हणून नियुक्त झाल्यानंतर, ३३ वर्षांच्या कालावधीत बँकिंग क्षेत्रामध्ये त्यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या नियुक्तीपूर्वी ते कॅनरा बँकेमध्ये रिटेल विभागाचे नेतृत्व करीत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली कॅनरा बँकेने यामध्ये सर्वात जास्त वाढ नोंदविली होती. हेमंतकुमार टम्टा यांनी त्यांच्या कार्यकाळात विविध महत्त्वाची पदे भूषविली आहेत.

बँकेच्या मूलभूत धोरणामध्ये सुधारणा करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. बँकिंग कार्यक्षेत्राच्या विविध अंगाचा त्यांना समृद्ध अनुभव असून, कॅनरा बँकेच्या नागपूर, आग्रा येथील शाखा आणि प्रशासकीय कार्यालये, तसेच दिल्लीचे प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हेमंतकुमार यांनी एलएलबी, एमबीए आणि आयबीसीएफ पदवी प्राप्त केली आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link