Next
बेक्ड् सरप्राइज
BOI
Sunday, October 14, 2018 | 10:00 AM
15 0 0
Share this article:


अगदी पटकन एकदम आगळावेगळा पदार्थ बनवायचं तुमच्या डोक्यात असेल, तर ही ‘बेक्ड् सरप्राइज’ची रेसिपी अगदी उत्तम आहे. नावाप्रमाणेच ही रेसिपी सरप्रायजिंग अशी आहे. मोतीचूर बुंदी, छोटे गुलाबजाम आणि रबडी यांच्यापासून बनलेला हा पदार्थ या तिन्ही पदार्थांच्या चवींचे वेगळेपण राखत एका संमिश्र अफलातून चवीचा अनुभव देतो. जिभेवर रेंगाळणारी ही चव मन तृप्त करून जाते. बघा एकदा करून आणि अनुभव घ्या या सरप्रायजिंग रेसिपीचा...  
.......
साहित्य :  छोटे गुलाबजाम - १०० ग्रॅम, गोड मोतीचूर बुंदी - १०० ग्रॅम, दूध - २ लिटर,साखर - ५० ग्रॅम, वेलची पावडर - अर्धा  टीस्पून, कापलेले ड्रायफ्रूट - एक टेबलस्पून. 

कृती :  एक खोलगट भांडे घ्या. त्यात दूध घालून चांगले आटवून घट्ट रबडी बनवून घ्या. त्यात साखर, वेलची पावडर घाला आणि नीट हलवा. यासाठी तयार रबडी घेतली तरी चालेल. 


आता दुसरे एक खोलगट भांडे घ्या. त्यात मोतीचूर बुंदी, छोटे गुलाबजाम घाला आणि चमच्याच्या मागच्या बाजूने नीट दाबा. त्यानंतर त्यात रबडी ओता आणि हे मिश्रण १८० सेल्सिअसवर, सुमारे पाच मिनिटे ओव्हनमध्ये ठेवा. त्यानंतर ओव्हनमधून काढून त्याचे तुकडे करून घ्या.

त्यावर मस्त ड्रायफ्रूट पसरवा आणि गरमागरम खायला द्या, हे अफलातून ‘बेक्ड् सरप्राइज.’

- शेफ केशब जाना, ऑरिटेल कन्व्हेन्शन, स्पा अँड वेडिंग रिसॉर्ट, तळेगाव

(शेफ केशब जाना यांनी सणासुदीसाठी तयार केलेल्या सर्व खास रेसिपी वाचण्यासाठी येथे क्लिक करा. पुण्याजवळील तळेगाव येथील ‘ऑरिटेल कन्व्हेन्शन, स्पा अँड वेडिंग रिसॉर्ट’बद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search