Next
‘कर्ज मुदतीत फेडावे’
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
BOI
Wednesday, July 10, 2019 | 05:39 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने आर्थिकदृष्ट्या मागास तरुणांना उद्योग, व्यवसायासाठी चालना देण्याचे काम होत आहे. त्यातून तरुणांनी चांगला व्यवसाय करून महामंडळाने दिलेले कर्ज मुदतीत फेडावे,’ असे आवाहन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. 

महामंडळाच्या पुणे व सोलापूर कार्यालयाअंतर्गत बीज भांडवल व अनुदान योजनेच्या नऊ लाभार्थ्यांना मंजूर अनुदानाचे धनादेश चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. विविध व्यवसायांसाठी या लाभार्थ्यांना एकूण ३१ लाख २२ हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले असून, त्यापैकी सहा लाख चार हजार ४७१ रुपये रकमेचे धनादेश या वेळी देण्यात आले. 

या वेळी महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांच्यासह राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, नवनगर प्राधिकरणाचे अध्यक्ष सदशिव खाडे, भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिलीप खुडे, शिवाजी मांजरे, एन. एम. वाघमारे, तसेच जिल्हा व्यवस्थापक, कर्मचारी, लाभार्थी उपस्थित होते. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search