Next
पशुवैद्यक विद्यापीठात गोशाळा संचालकांसाठी राज्यस्तरीय कार्यशाळा
BOI
Friday, July 26, 2019 | 01:16 PM
15 0 0
Share this article:

नागपूर : येथील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठात (माफसू) ‘विज्ञान सुलभ गोशाळा व्यवस्थापन’ या विषयावर २८ जुलैला राज्यस्तरीय कार्यशाळा व चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यात राज्यातील गोशाळा संचालकांना गोसंवर्धनाची दिशा विशद केली जाणार आहे. 

राज्यात ५००हून अधिक गोशाळा स्थापन करण्यात आल्या असून, गेल्या २०० वर्षांतील अशा सर्व गोशाळा शेकडो गायी आणि गोवंशाचे सांभाळ केंद्र म्हणून प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत आहेत. या गोशाळेतील गायी उपयुक्ततेच्या दृष्टीने आणि संवर्धनाच्या योग्य पद्धतीसाठी वैज्ञानिक शिफारशीनुसार सुयोग्य व्यवस्थापनाद्वारे सांभाळण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली असून, राज्यातील गोशाळा संचालकांसह स्थानिक पातळीवर नियमित मदत करणारे पशुवैद्यकीय अधिकारी यांनाही कार्यशाळेसाठी सहभागी होण्याचे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात येत आहे. 

राज्यातील गोशाळांचे तांत्रिक परीक्षण ‘माफसू’तर्फे २०१८-१९ मध्ये करण्यात आले असून, गोशाळांबाबत शिफारशींचा तांत्रिक अहवाल राज्यशासनास सादर करण्यात येणार आहे. या अहवालाचे प्रकाशन याच कार्यशाळेत होणार असून, तांत्रिक अहवालाचा संदर्भ राज्यातील गोवंश संवर्धन कार्यासाठी उपयोगी ठरू शकेल, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. आशिष पातूरकर यांच्यातर्फे करण्यात आले आहे. या कार्यशाळा आणि चर्चासत्रासाठी मुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री आणि पशुसंवर्धन मंत्री यांना निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली. 
‘’
गोशाळा संचालकांची कार्यशाळा नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाच्या रजत जयंती सभागृहात दिनांक २८ जुलै रविवार रोजी संपन्न होणार असून सकाळी १०.०० वाजता नि :शुल्क नोंदणी आणि सविस्तर विषय सादरीकरण होणार आहे. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी गोविज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार आणि राज्यातील इतर गोशाळा संस्थांची मदत लाभली आहे. तरी सदरील कार्यशाळेत गोशाळा संचालक आणि पशुवैद्यकांनी सहभागी होवून गोसंवर्धन आणि विकास कार्यात वैज्ञानिक आणि तांत्रिक शिफारशी बाबत वैचारिक मंथन आणि सुयोग्य कृतिची जोड द्यावी असे आवाहन पशुवैद्यक महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजहंस आंबाडकर यांच्यासह प्रा. डॉ. नितीन मार्कंडेय , प्रा. डॉ. बाबासाहेब नरळदकर आणि डॉ. अमोल पाटील यांनी केले आहे. 

कार्यशाळेविषयी :
दिवस : रविवार, २८ जुलै २०१९
वेळ : सकाळी १० वाजता 
स्थळ : पशुवैद्यक महाविद्यालयाचा रजत जयंती सभागृह, नागपूर.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search