Next
‘फिनोलेक्स’ आणि ‘मुकुल माधव’ यांचा पुरस्काराने गौरव
प्रेस रिलीज
Monday, December 10, 2018 | 11:14 AM
15 0 0
Share this article:

‘गुजरात सीएसआर एक्सलन्स अॅवॉर्ड’ हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते स्वीकारताना ‘फिनोलेक्स’चे वरिष्ठ सीएसआर अधिकारी नितूल बरोट.

मुंबई : पीव्हीसी पाइप्स आणि फिटिंग्जचे उत्पादन करणाऱ्या फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्यांचे सीएसआर भागीदार असलेल्या मुकुल माधव फाउंडेशन यांना दोन प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. ‘इंडीवूड सीएसआर एक्सलन्स अॅवॉर्ड्स २०१८’मध्ये ‘बेस्ट सीएसआर प्रॅक्टिसेस इन स्पेशॅलिटी हेल्थकेअर’ पुरस्कार आणि ‘गुजरात सीएसआर एक्सलन्स अॅवॉर्ड २०१८’ मध्ये ‘बेस्ट वॉटर कर्न्झव्हेशन अँड वॉटरशेड’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

कंपनी स्थापन झाल्यापासूनच हाती घेतलेल्या उल्लेखनीय समाजसेवी उपक्रमांसाठी ‘फिनोलेक्स’ला हे पुरस्कार देण्यात आले. ‘गुजरात सीएसआर एक्सलन्स अॅवॉर्ड’ हा पुरस्कार ‘फिनोलेक्स’चे वरिष्ठ सीएसआर अधिकारी नितूल बरोट यांनी, तर ‘इंडीवूड सीएसआर एक्सलन्स अॅवॉर्ड्स’ हा पुरस्कार ‘फिनोलेक्स’च्या मार्केटिंग कम्युनिकेशन्सचे सहाय्यक व्यवस्थापक अनुराग दीपांकर यांनी स्वीकारला.

दोन हजार भारतीय कॉर्पोरेट्स आणि कोट्यधीशांचा समावेश असलेल्या परिषेदेने हाती घेतलेल्या १० अब्ज डॉलर्सच्या इंडीवूड प्रकल्पाचाच एक भाग म्हणून ‘इंडीवूड सीएसआर एक्सलन्स अॅवॉर्ड्स’चे हैदराबाद येथील हिटेक्स एक्झिबिशन सेंटर येथे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. हा पुरस्कार ‘फिनोलेक्स’ने छायाचित्रणाच्या रशियन सांस्कृतिक मंत्रालयाच्या प्रमुख व्हलेरिया व्ही. कोलेस्निक यांच्या हस्ते स्वीकारला. हॉस्पिटॅलिटी उद्योग व्यावसायिकांच्या प्रयत्नांची आणि या क्षेत्राच्या विकासासाठी काम करणाऱ्या संघटनांची दखल घेण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

रशियन सांस्कृतिक मंत्रालयाच्या प्रमुख व्हलेरिया व्ही. कोलेस्निक यांच्या हस्ते ‘इंडीवूड सीएसआर एक्सलन्स अॅवॉर्ड्स’ स्वीकारताना ‘फिनोलेक्स’च्या मार्केटिंग कम्युनिकेशन्सचे सहाय्यक व्यवस्थापक अनुराग दीपांकर.

गुजरातमधील अहमदाबाद शहरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘फिनोलेक्स’ आणि मुकुल माधव फाउंडेशनला ‘गुजरात सीएसआर समिट २०१८’ दरम्यान ‘बेस्ट वॉटर कर्न्झव्हेशन अँड वॉटरशेड पुरस्कार’ देण्यात आला. हा पुरस्कार पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच कुशल विकास आणि औद्योजिकता मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि आदिवासी विकास, पर्यटन, वन, महिला व बालकल्याण मंत्री गणपतभाई वासावा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि ‘मुकुल माधव’च्या पाणी प्रकल्पांचे कौतुक करत येत्या काळात जलसंवर्धनाची तीव्र गरज भासणार असल्याचे नमूद केले. या पुरस्कार समिटसाठी संसद सदस्य, आमदार, महापौर, जिल्हाधिकारी आणि सरकारी अधिकारीही उपस्थित होते.

या प्रसंगी ‘फिनोलेक्स’च्या नॉन-इंडिपेंडंट संचालक आणि सीएसआर प्रमुख, रितू छाब्रिया म्हणाल्या, ‘फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनने सामाजिक जबाबदारी म्हणून केलेल्या कामांची दखल घेतली जाण्याचा हा क्षण अभिमानाचा आहे. समाजसेवा हा ‘फिनोलेक्स’चा प्रमुख आधारस्तंभ आहे आणि फाउंडेशनच्या मदतीने कंपनीने या क्षेत्रात मोठी उंची गाठली आहे. कंपनी सातत्याने आपण राहातो त्या समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रयत्न करत असते आणि लोक व पर्यावरणाला संतुलित यंत्रणा पुरवण्यासाठीही कंपनीचा प्रयत्न सुरू असतो. भविष्यातही आमचा हाच दृष्टीकोन कायम राहाणार आहे. आमच्या कामाचा गौरव केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. यापुढेही आम्ही अशीच प्रगती करत राहू आणि इतरांसाठी अनुकरणीय मापदंड प्रस्थापित करत राहू.’

फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे जाळे रत्नागिरी, पुणे, उर्से आणि मासर, वडोदरा, गुजरात आदी ठिकाणी परसले असून, कंपनीच्या जवळील परिसरात, तसेच उर्वरित भारतात कंपनी आरोग्यसेवा, शिक्षण, समाजकल्याण आणि पाणी प्रकल्प अशा क्षेत्रात सक्रियपणे काम करत आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search