Next
पुणे येथे ‘आर्टस् अँड हँडिक्राफ्ट्स’ प्रदर्शन
प्रेस रिलीज
Wednesday, May 30 | 03:58 PM
15 0 0
Share this story

पुणे : लाइफस्टार ग्लोबल वेल्फेअर फाउंडेशन व जयहिंद परिवारातर्फे दोन व तीन जून २०१८ या कालावधीत इंडियन आर्टस् अँड हँडिक्राफ्ट्स प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन माणिकचंद ग्रुपच्या संचालिका जान्हवी धारिवाल व वरून डेव्हलपर्सचे संचालक रूपेश सामंत यांच्या हस्ते दोन जूनला सकाळी ११.३० वाजता राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी, पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृह घोले रोड, पुणे येथे होणार आहे. हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री आठ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील कलाकारांच्या चित्रांचा यात समावेश असणार आहे. कॅनवास व पेपरवर कामे केलेली असून, अॅक्रेलिक, ऑइल कलर, पेन्सिल शेडिंग, चारकोल या माध्यमांचा वापर करून चित्रे रेखाटली आहेत. ग्रामीण जीवन, आदिवासी लोककला, आधुनिक कला, निसर्ग चित्रे, संगीत, प्रतिकात्मक चित्रे अशा विषयांवरील चित्रप्रदर्शन पाहण्याची संधी पुणेकर रसिकांना मिळणार आहे. त्याचबरोबर हँडिक्राफ्ट, स्टोन पेंटिंग, निडल वर्क यांचे अप्रतिम नमुने पाहता येणार आहेत.

प्रदर्शनाविषयी :
दिवस : दोन व तीन जून २०१८
वेळ : सकाळी १० ते रात्री आठ
स्थळ : राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी, पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृह घोले रोड, पुणे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link