Next
दाभाड केंद्रातील मुख्याध्यापकांनी केली झाडांची जोपासना
BOI
Tuesday, September 18 | 01:15 PM
15 0 0
Share this story



भिवंडी :
ठाण्याच्या भिवंडी तालुक्यातील दाभाड शैक्षणिक केंद्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे...’ ही उक्ती प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांना शिकवली आहे. त्यांनी गेल्या वर्षी स्वखर्चाने लावलेली आणि स्वतः निगा राखलेली झाडे यंदा डोलू लागली आहेत. त्यामुळे झाडे लावण्याइतकेच ती जगवणेही महत्त्वाचे असते, हा संदेश त्यांनी दिला आहे. 

दाभाड शैक्षणिक केंद्राअंतर्गत येणाऱ्या बारा शाळांतील मुख्याध्यापकांनी मागच्या वर्षी जून महिन्यात स्वतःच्या खर्चाने कल्याण पाठारे नर्सरी येथून बारा विविध प्रकारची झाडे आणली आणि दाभाड शैक्षणिक केंद्र कार्यालयाच्या परिसरात ती लावली. प्रत्येकाने एक झाड दत्तक घेऊन त्याला संरक्षण देण्यासाठी बांबू, हिरवे कापड असा खर्च स्वतःच केला. तसेच, वर्षभर त्यांना पाणी घालून सर्व झाडांची निगाही घेतली. आता वर्षभरानंतर ती झाडे डोलू लागली आहेत.

उदय पाटील , संजय गोसावी, केंद्रातील मुख्याध्यापक अश्विनी गावित, मनीषा धनगर, भाई पाटील, कविता भोये, दिनेश परदेशी, सुधीर पाटील, राजेंद्र भोईर, यशवंत म्हस्कर आदी सर्वांनी मेहनत घेऊन झाडे जगवली आहेत. त्यांच्या या उपक्रमाची स्तुती करून दाभाड केंद्राचे केंद्रप्रमुख श्यामसुंदर दोंदे यांनी सर्व मुख्यध्यापकांचे आभार मानले आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link