Next
‘ओमरॉन’तर्फे पुण्यात मशीन सेफ्टी परिसंवाद
BOI
Saturday, January 27 | 05:53 PM
15 0 0
Share this story

पुणे : प्रगत औद्योगिक ऑटोमेशन क्षेत्रातील जागतिक नेतृत्व असलेल्या ‘ओमरॉन’तर्फे मल्टि-सिटी मशीन-सेफ्टी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. ऑटोमोटिव्ह उत्पादकांमध्ये शॉप फ्लोअर सुरक्षेबद्दल जागरूकता व्हावी हा या परिसंवादाचा मूळ हेतू आहे. परिसंवादाचा पहिला टप्पा पुणे येथे पार पडला.

या क्षेत्रातील मशीन बिल्डर्स, ऑटो मेकर्स आणि उद्योग क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ असे जवळपास २०० तज्ज्ञ या परिसंवादाला उपस्थित होते. ज्ञान विनिमयाच्या हेतूने भारत फोर्ज लिमिटेडचे असोसिएट वाईस प्रेसिडेंट राहुल लाळे, वेरॉक इंजिनियरिंगच्या वरिष्ठ व्यवस्थापक अपूर्बा बोस, मिंडाव्हास्ट ऍक्सेस सिस्टीमच्या प्लांट (प्रकल्प) चे प्रमुख प्रदीप कुमार पटेल, ट्वीन इंजिनियर्सचे संस्थापक आणि कार्यकारी संचालक प्रदीप भालवणकर हे सर्व या परिसंवादामध्ये सहभागी झाले होते.

या परिसंवादामध्ये ऑटोमोटिव्ह उत्पादकांच्या शॉप फ्लोअर्सवरील सुरक्षा, मशिन सेफ्टी सोल्यूशन प्रॅक्टिसेस यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. निर्मिती प्रकल्पांची उत्पादकता वाढविण्यामध्ये सुरक्षितता खूप महत्त्वाची भूमिका पार पाडते आणि हे प्राप्त करण्यासाठी ऑटोमेशनचा वाटा महत्त्वाचा ठरतो.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link