Next
बिग बी झाले भावूक !
प्रेस रिलीज
Wednesday, October 11 | 03:25 PM
15 0 0
Share this story

मुंबई :   कौन बनेगा करोडपतीच्या नवव्या पर्वात  'बिग बी' अमिताभ बच्चन यांचा ७५ वा वाढदिवस ११ ऑक्टोबरला अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. ते बघून 'बिग बी' खूप आनंदी आणि भावूक झाले. 

केबीसीच्या टीमने अमिताभ यांनी जिथून पदवी प्राप्त केली आहे, त्या  शेरवुड कॉलेज, नैनितालचा एक विशेष व्हिडिओ बनवला ज्यात तिथले विद्यार्थी आणि प्राध्यापक होते. बच्चन यांच्या कॉलेजच्या आठवणींचे विविध आकाराचे खूप सारे पोस्टर्स बनवण्यात आलेले होते. आपले महाविद्यालय बघून खूप आनंदित झाले होते. ही चित्रफित बघताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. 

 गिटार वादक नीलाद्रीकुमार यांनीदेखील त्यांच्यासाठी ‘हॅपी बर्थडे’ची धून सादर केली. सेटवर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हा विशेष भाग बुधवारी रात्री ९ वाजता  सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link