Next
‘झोन स्टार्टअप्स’तर्फे पुण्यात लिलावाचे आयोजन
प्रेस रिलीज
Friday, August 03, 2018 | 02:23 PM
15 0 0
Share this story

पुणे : येथील स्टार्टअप्सना मदत करण्याच्या उद्देशाने लोढा ग्रुपचा ‘पलावा अॅक्सेलेटर’ आणि टोरोंटोमधील रायरसन फ्यूचर्स इन्का.द्वारे संचलित अॅक्सेलेटर ‘झोन स्टार्टअप्स’तर्फे शुक्रवारी, तीन ऑगस्ट रोजी एका लिलावाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी तीन ते पाच या वेळेत ‘व्हेंचर सेंटर’मधील एनसीएल इनोव्हेशन पार्क येथे हा कार्यक्रम होणार आहे.

‘पलावा अॅक्सेलेटर’द्वारे मान्याताप्राप्त स्टार्टअप्सना पाठिंबा देण्याबरोबरच एकत्र काम करण्यासाठी कार्यालय, मोफत निवासी सुविधा, व्यवसाय विकास करण्यासाठी सहकार्य, पलावा सिटीमध्ये उत्पादनांची सुविधा देण्याची संधी, उच्च दर्जाच्या गुंतवणूकदार नेटवर्क्सची सुविधा, मेन्टॉरशीप प्रोग्राम्स आणि नेटवर्किंग इव्हेंट्सची सुविधा दिली जाते. आतापर्यंत क्लीरनटेक गव्हर्नन्स, एड-टेक, फिनटेक अशा विविध तंत्रज्ञान क्षेत्रांमधील आठ स्टार्टअप्सना त्यांनी मार्गदर्शन केले आहे.

उत्पादन व ऑटोमोबाइल उद्योगासाठी प्रसिद्ध असलेले पुणे शहर भारतातील टेक स्टार्टअप्ससाठी महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास आले आहे. येथील स्टार्टअप्सना प्रोत्साहन आणि पाठबळ देण्यासाठी ‘पलावा अॅक्सेलेटर’ विविध उपक्रम राबवत आहे. लोढा ग्रुपतर्फे साडेचार हजार एकर जागेवर ‘पलावा सिटी’ ही स्मार्ट सिटी विकसित करण्यात येत असून, येथे सर्व मूलभूत गरजा जवळच्या अंतरावर उपलब्ध असतील. तेथे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी स्टार्टअप्सना मोठी संधी मिळणार आहे.

काही स्टार्टअप्सने तेथे सुविधा यशस्वीपणे उपलब्ध केल्या आहेत. यामध्ये ‘उटोपिया’ हे आउटडोअर लाइट ऑटोमेशन व्या‍सपीठ उत्त‍म उदाहरण आहे. ही कंपनी कमी खर्चामध्ये आणि स्मार्ट पद्धतीने दिवसाच्या वेळेनुसार ऑटोमेट स्ट्रिट लाइट्सची सुविधा देते; तसेच काही दोष असल्यास ते शोधून काढते. हे सोल्युशन पलावामध्ये बसवण्यात आले आणि नंतर आयएसबी हैद्राबाद व आयआयटी बॉम्बेसारख्या इतर ठिकाणी बसवण्यात आले.

लोढा ग्रुप कंपनीसाठी कॉर्पोरेट ग्राहक देखील बनले आहे. फिंगपे हे ‘स्टार्टअप’ पलावामधील सर्व रिटेलर्सना आधार-आधारित पेमेंट्सची आणि निवासींना कॅशलेस व्यवहाराची सुविधा देते.

कार्यक्रमाविषयी :
दिवस :
शुक्रवार, तीन ऑगस्ट २०१८
वेळ : दुपारी तीन ते पाच
स्थळ : एनसीएल इनोव्हेशन पार्क, व्हेंचर सेंटर, पुणे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link