Next
‘महिंद्रा’तर्फे एका वर्षात १० हजार वाहनचालकांना प्रशिक्षण
आनंद महिंद्रा यांच्यातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र
प्रेस रिलीज
Wednesday, April 03, 2019 | 05:43 PM
15 0 0
Share this article:मुंबई : ‘महिंद्रा लॉजिस्टिक्स’ने प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचा (पीएमव्हीकेवाय) एक भाग म्हणून गेल्या वर्षभरात देशभरातील दहा हजार वाहनचालकांना यशस्वीपणे प्रशिक्षण दिले आहे. २२९ ठिकाणी आयोजित केलेल्या या प्रशिक्षणादरम्यान चालकांना सुरक्षेचे धडे देत सक्षम करण्यावर भर देण्यात आला. महाराष्ट्रात चार हजार ४८० वाहनचालकांना प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षण उपक्रमामागे चालकांना मोठ्या प्रमाणावर एकत्रित करून त्यांना जबाबदारीने वाहन चालवणे, गाडीची स्थिती समजून घेणे, नियमपालन, प्रतिकूल परिस्थितीत सुरक्षितपणे गाडी चालवणे, वागणुकीचे प्रशिक्षण, ताण व्यवस्थापन आणि संवाद आदी विषयांची माहिती देण्यात आली. प्रशिक्षणाच्या मुख्य घटकांमध्ये रस्ता सुरक्षा, आपत्कालीन आणि संकट व्यवस्थापन, वाद निराकरण विशेषतः रस्त्यावरील भांडणांचे व्यवस्थापन, स्त्री प्रवासी सुरक्षा, गाडीची देखभाल व टिकाऊपणा, नियमपालन, अपघात किंवा तत्सम प्रसंगांमध्ये प्रथमोपचार करणे यांचाही समावेश होता.  

‘महिंद्रा लॉजिस्टिक्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पिरोजशॉ सरकारी म्हणाले, ‘दहा हजार चालकांना यशस्वीपणे प्रशिक्षण दिल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. मी त्यासाठी महिंद्रा लॉजिस्टिक्सचे अभिनंदन करतो. चालक हे आपल्या संपूर्ण यंत्रणेतील महत्त्वाचा घटक आहे आणि ते देशाची अर्थव्यवस्था अक्षरशः चालवतात. त्यामुळेच ते प्रशिक्षित व सुरक्षित असणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. या उपक्रमांतर्गत आम्ही केवळ आमच्यासाठी काम करणाऱ्या चालकांना प्रशिक्षण दिले असे नाही, तर एकंदरीतच या क्षेत्रातील चालकांना प्रशिक्षित केले.’‘महिंद्रा समूहा’चे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी पंतप्रधान मोदी यांना पाठलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘एक जबाबदार व्यवसाय समूह या नात्याने माझ्यासाठी ही लक्षणीय कामगिरी आहे आणि चालकांचा कौशल्य विकास करताना ‘मेक इन इंडिया’वर लक्ष केंद्रित करत त्याला ‘महिंद्रा लॉजिस्टिक्स’तर्फे असाच पाठिंबा यापुढेही दिला जात राहील याविषयी मला शंका वाटत नाही.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search