Next
‘सीएमडीए’तर्फे पुण्यात ई-वेस्ट संकलन मोहीम
प्रेस रिलीज
Tuesday, June 05, 2018 | 02:20 PM
15 0 0
Share this story

​​​​‘सीएमडीए’तर्फे पुण्यात राबवण्यात येत असलेल्या ई-वेस्ट संकलन मोहिमेची पत्रकार परिषदेत माहिती देताना,(डावीकडून) सीएमडीएचे माजी अध्यक्ष सुरेश जोशी, सीएमडीएचे अध्यक्ष नरेंद्र मोदी आणि ई-वेस्ट प्रकल्प संचालक रत्नेश राठी.

पुणे : भारतातील आयटी डीलर्स आणि रिसेलर्सपैकी प्रमुख संस्था असलेल्या ‘कॉम्प्युटर अँड मीडिया डीलर्स असोसिएशन, पुणे’तर्फे (सीएमडीए) जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, पुण्यात मंगळवार, पाच जूनपासून ई-वेस्ट संकलन मोहीम राबवण्यात येत आहे. ‘ई-वेस्टच्या विघटनासाठी सरकारच्या ईपीआर निकषांचे पालन करून, ही संपूर्ण मोहिम राबवली जाणार आहे’, अशी माहिती सीएमडीएचे अध्यक्ष नरेंद्र मोदी, ई-वेस्ट प्रकल्प संचालक रत्नेश राठी आणि सीएमडीएचे माजी अध्यक्ष सुरेश जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राठी पुढे म्हणाले, ‘हा उपक्रम म्हणजे फक्त ही एका वेळेपुरते मोहीम नसून, तो तीनशे पासष्ठ दिवस चालणारा उपक्रम आहे. सीएमडीएच्या मते, पृथ्वी हरित ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. पुण्यातील जास्तीत जास्त भागात ही मोहीम राबवावी म्हणून वीस संकलन केंद्रांवर हा ई-वेस्ट संकलित केला जाणार आहे. आम्ही या सर्व संकलन केंद्रांवर ई-वेस्ट कलेक्शन बीन्स ठेवणार आहोत आणि कॉर्पोरेट कंपन्या, नागरिकांना त्यांचा ई-वेस्ट या केंद्रांवर आणण्यासाठी आवाहन करणार आहोत. आमच्या केंद्रांवर या वस्तू स्वीकारल्या जातील आणि यासाठी त्यांना पावती देखील दिली जाईल. आमचे सर्व तीनशेपंच्याहत्तर सदस्य आणि व्यवसाय प्रमुख या उपक्रमाचा भाग असतील. या मोहिमेला अधिकृत रिसायक्लर्सचाही पाठिंबा आहे.’

नरेंद्र मोदी म्हणाले, ‘आजच्या स्मार्टफोन आणि कॉम्प्युटरच्या युगात ई-वेस्ट हे जागतिक स्तरावरचे मोठे आव्हान बनले आहे. भारतात दरवर्षी जवळपास तीन दशलक्ष टन ई-वेस्ट जमा होतो. यामुळे भारत ई-वेस्ट तयार करण्यामध्ये जगातील पाचव्या क्रमांकाचा देश बनला आहे. राज्याचा विचार करता, ई-वेस्ट तयार करण्यामध्ये महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. ई-वेस्टचे मानवाच्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर होणारे परिणाम हे सर्वज्ञात आहे. जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जेव्हा त्यांचा वापर केल्यानंतर काही काळाने तोडल्या जातात, जाळल्या जातात किंवा जेव्हा जमिनीवर त्यांची विल्हेवाट लावली जाते तेव्हा त्या जमीन आणि पाणी दूषित करतात. पुण्यात दरवर्षी दहा ते सोळा हजार मेट्रिक टन इतका ई-वेस्ट जमा होतो. यापैकी जवळपास ७५ टक्के ई-वेस्ट वर असंघटित क्षेत्राकडून प्रक्रिया आणि विघटन केले जात आहे. यापैकी अनेक कामगार ही लहान मुले आहेत, जी त्यांच्या हातांसाठी कोणतेही संरक्षण न वापरता काम करत असतात. घातक मेटल्ससोबत त्यांना काम करावे लागत असते. ते त्यांच्या आरोग्याला धोकादायक  ठरू शकतात. त्याबद्दल आम्हाला जागरूकता निर्माण करायची आहे. जमीन, पाणी आणि मानवावर याच्या होणार्या  दुष्परिणामांबद्दल देखील जागरूकता निर्माण करणार आहोत. याकरता आम्ही नागरिकांना आवाहन करत आहोत कि, त्यांनी त्यांचा ई-वेस्ट फक्त अधिकृत संकलित केंद्रांवरच जमा करावा आणि त्याची पावती देखील मागावी, यामुळे ई-वेस्टची पुर्नप्रकिया होण्याबाबत शाश्वती मिळेल आणि आपली पृथ्वी हरित ठेवण्यास मदत होईल.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link