Next
सुमन अग्रवाल ‘ग्लोबल एनरिचमेंट ऑर्गनायझेशन’च्या आंतरराष्ट्रीय संचालकपदी
BOI
Tuesday, July 30, 2019 | 04:37 PM
15 0 0
Share this article:


ठाणे : येथील समाजसेविका सुमन अग्रवाल यांची ‘ग्लोबल एनरिचमेंट ऑर्गनायझेशन’च्या (जिओ) आंतरराष्ट्रीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठाण्यात झालेल्या संघटनेच्या कार्यक्रमात, ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष मनिष शहा यांच्या हस्ते अग्रवाल यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. 

‘देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत शिक्षण पोहोचवणे, बालकल्याण, सामाजिक सुसंवादिता, उद्योजकता, शेतकऱ्यांचे हक्क संरक्षण, त्वरीत न्याय, ललित कलेचे आणि संस्कृतीचे संवर्धन करणे हे जिओ या आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचे उद्देश्य आहे’, असे याप्रसंगी आपल्या संघटनेबाबत माहिती देताना मनिष शहा यांनी सांगितले. तसेच पुढे ते म्हणाले, ‘आर्थिकदृष्ट्या कमकुवत संवर्गांसाठी शिक्षण, विशेषतः मुलांच्या समग्र विकासासाठी आणि स्त्रियांच्या आरोग्य व स्वच्छतेसाठीही संघटना हमखासपणे विविध प्रकल्पांवर सक्रिय आहे आणि म्हणूनच सामाजिक क्षेत्रात मागील २५ वर्षांपासून सातत्याने झटणाऱ्या समाजसेविका सुमनताई अग्रवाल यांना आमच्यासोबत घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, ज्यामुळे आम्हाला या संस्थेच्या माध्यमातून समाजाला त्यांच्या सखोल अनुभवाचा फायदा करून देता येईल.’ 
 
कार्यक्रमात आपल्या नियुक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत अग्रवाल यांनी जाहीर केले की, ‘महिलांमधील कलेला आणि त्यांच्यातील कर्तृत्वाला वाव देण्यासाठी, महिला सक्षमीकरणासाठी आम्ही यंदाच्या गणेशोत्सवाच्या आधी ‘जिओ’च्या माध्यमातून एका भव्य प्रदर्शनाचे आयोजन करणार आहोत. या प्रदर्शनामध्ये महिलांना आर्थिकरीत्या स्वतंत्र, सक्षम आणि सामर्थ्यवान करण्याच्या दृष्टीने त्यांना मोफत किंवा सवलतीच्या दरात स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहेत.    

सामाजिक क्षेत्रात सलगपणे साधारण २५ वर्षांपासून ‘महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी’च्या सरचिटणीस, ‘अखिल भारतीय काँग्रेस कमिटी’च्या सदस्या, ‘अखिल भारतीय अग्रवाल संमेलन’ या संस्थेच्या राष्ट्रीय सचिव, ‘लायन्स क्लब’च्या सक्रिय सदस्या, ‘मारवाडीज इन ठाणे वेल्फेअर’ व ‘सुप्रयास फाऊंडेशन’ या संस्थांच्या संस्थापिका-अध्यक्षा असलेल्या सुमनताई अनेक गोशाळा, अनाथाश्रमांसह विविध सामाजिक संघटनांशी सक्रियपणे जोडलेल्या आहेत. याशिवाय महिलांच्या न्याय-हक्कासाठीही त्यांनी कार्य केले आहे. अॅसिड हल्ल्यांच्या बळी ठरलेल्या महिलांसाठी शासनाव्दारे कायदेशीर सामाजिक-आर्थिक न्याय देण्यात व मुलांचे शिक्षण आणि वृक्षारोपणाव्दारे निसर्गाच्या संरक्षणामध्ये त्यांनी दिलेले योगदान अतिशय मोलाचे आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search