Next
‘थ्रीएम इंडिया’चा ‘नन्ही कली’बरोबर सहकार्य करार
ग्रामीण महाराष्ट्रातील दोन हजार मुलींना शिक्षण देणार
प्रेस रिलीज
Thursday, November 15, 2018 | 04:26 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘थ्रीएम इंडिया’ने ‘नन्ही कली’ या वंचित मुलांना शिक्षण देणार्‍या सर्वांत मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या प्रकल्पाबरोबर सहकार्य करार केला. या अंतर्गत ‘थ्रीएम इंडिया’ने आंबेगाव विभागातील दोन हजार मुलींना शिक्षण देण्यासाठी सहकार्य केले.  

या विषयी बोलताना ‘थ्रीएम इंडिया’च्या व्यवस्थापकीय संचालिका देबरती सेन म्हणाल्या, ‘एका मुलीला शिक्षण दिल्याने कुटुंब, समाज आणि अर्थव्यवस्था या सर्वांवर सकारात्मक परिणाम होताना दिसतो. गेली अनेक वर्षे शिक्षणविषयक प्रकल्पांचे यशस्वी आयोजन करणार्‍या के. सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट आणि नांदी फाउंडेशनबरोबर सहकार्य करताना आम्हाला आनंद होत आहे. शिक्षणाविषयी आमचा विश्वास अधिक दृढ असताना ‘थ्रीएम इंडिया’ टीमला ‘नन्ही कली’विषयी आत्मियता वाटते. आम्हाला आशा आहे की यामुळे एक सकारात्मक फळ देणारी अशी ही भागिदारी असेल.’

‘विज्ञान आणि नाविन्यावर आधारीत कंपनी असल्याने ‘थ्रीएम’ने नेहमीच स्टेम अभ्यासक्रमात मुलांची वाढ होण्यावर लक्ष दिले आहे आणि त्याचबरोबर सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे,’ असे सेन यांनी सांगितले.   

के. सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टच्या ट्रस्टी आणि कार्यकारी संचालिका शीतल मेहता म्हणाल्या, ‘नन्ही कलीसाठी ‘टॅग’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, ७० टक्के मुलांना उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असते, तर ७४.३ टक्के मुलांना एक विशिष्ट क्षेत्र निवडून त्यात काम करायचे असते. ‘नन्ही कली’मध्ये आम्ही पहिली ते दहावी दरम्यानच्या मुलींना शिक्षण देतो. ज्यामुळे त्या त्यांची स्वप्ने साकार करू शकतील. ग्रामीण महाराष्ट्रातील दोन हजार वंचित मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतल्याबद्दल आम्ही ‘थ्रीएम इंडिया’चे आभार मानतो. या भागिदारीमुळे आता या मुलींच्या आयुष्यात सुधारणा होईल.’  

मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या आकडेवारी नुसार प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत जाऊ इच्छिणार्‍या मुलींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे; तसेच चारपैकी तीन मुलींना आपल्या कुटुंबियांना जगण्यास सहकार्य करायचे असते आणि २१व्या वर्षाआधी लग्न करायचे नसते, असे ‘टॅग’च्या सर्वेक्षणानुसार दिसून आले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link