Next
मॅक्सम्युलर भवनतर्फे पर्यावरण विषयावरील परिषद
२३ ते २५ जून दरम्यान पुण्यात आयोजन
BOI
Monday, June 17, 2019 | 04:55 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ग्योथं इन्स्टिट्यूट मॅक्सम्युलर भवनतर्फे आपल्या पाश प्रकल्पाअंतर्गत पुण्यात २३ ते २५ जून दरम्यान पर्यावरण आणि शाश्वतता या विषयावरील परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये १४ ते १६ वर्षे  वयोगटातील ११० विद्यार्थी सहभागी होत आहेत. या परिषदेत पर्यावरणीय, सामाजिक व आर्थिक शाश्वातता या संकल्पनेवर चर्चा होणार आहे.

ही परिषद या आधी मुंबई व कोलकाता येथे आयोजित करण्यात आली होती या वर्षी ती पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत पर्यावरण, सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार असून, या विषयांवरील सहा शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्दिष्ट स्थानिक, देश, तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर शाश्वतता या विषयावर काम करणार्याआ तरुणांचे जगभरात जाळे तयार करणे हा आहे.

या परिषदेमध्ये कचरा व्यवस्थापन, जल, वन्यजीवन, फेअर ट्रेड, हॉर्टीकल्चर तसेच प्रशासनाचा सहभाग या विषयांवर मार्गदर्शन केले जाईल. तिसऱ्या दिवशी सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी परिषदेमध्ये शिकलेल्या गोष्टींचे प्रकल्पातून सादरीकरण करावयाचे आहे.या परिषदेसाठी पूर्वतयारी म्हणून मे महिन्यात दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकास ध्येयांवर (युएन सस्टेनेबिलिटी डेव्हलपमेंट गोल्स) मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळांमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात आणि शाळेत शाश्वतता कशी आणता येईल यावर सादरीकरण करण्यास प्रोत्साहित करण्यात आले. हे सादरीकरण पोस्टर्स, गाणी, नृत्य अणि नाटिका या स्वरूपात करण्यात आले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search