Next
‘बुक रिव्ह्यू’ स्पर्धेस चांगला प्रतिसाद
प्रेस रिलीज
Tuesday, February 27 | 02:45 PM
15 0 0
Share this story



पुणे :
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीचे एम. ए. रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटरच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे ‘आंतर महाविद्यालयीन बुक रिव्ह्यू’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आझम कँपसमधील हायटेक हॉल येथे झालेल्या या स्पर्धेस विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.

मानव संसाधन विभागाच्या (कॉनरड) संचालक प्रचिका सक्सेना यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. श्रेयस करंजकर (अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज) याने विजेतेपदावर, तर नजाला नवाब (एम. ए. रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटर) हिने उपविजेतेपदावर आपले नाव कोरले. सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे पारितोषिकाचे स्वरूप होते.

‘एमसीई’चे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार आणि एम. ए. रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटर’च्या प्राचार्य अनिता फ्रांत्झ यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. मलाका स्पाईसचे शिक्षण व्यवस्थापक डॉ. समीर दिवाणजी, महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. विद्या कदम यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

कार्यक्रमाचे संयोजन ग्रंथपाल चंदा सुपेकर यांनी केले. स्पर्धेत शहारातील विविध महाविद्यालयांनी भाग घेतला होता. यामध्ये भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, एम. ए. रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटर, अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी, अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस, एमसीई सोसायटीज् इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, आबेदा इनामदार सिनीअर कॉलेज, अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या महाविद्यालयांचा समावेश होता.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link