Next
‘प्रोअॅक्टिव्ह अॅबॅकस समर कॉम्पिटिशन’मध्ये ‘एज्युकेअर’चे यश
BOI
Monday, June 17, 2019 | 04:40 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : राष्ट्रीय स्तरावरील नामांकित प्रोअॅक्टिव्ह अॅबॅकस या राष्ट्रीय कंपनीतर्फे विभागीय स्तरावरची ‘समर कॉम्पिटिशन २०१९’ आयोजित केली होती. यात रत्नागिरीतील एज्युकेअर फाउंडेशनच्या एज्युकेअर प्रोअॅक्टिव्ह अॅबॅकस सेंटरच्या विद्यार्थ्यांनी विविध गटांत चांगला रँक मिळवत पाच ट्रॉफी व २३ सुवर्णपदकांची कमाई केली.

या वर्षीच्या एप्रिल, मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीत एज्युकेअर फाउंडेशनतर्फे अॅबॅकसचे उन्हाळी विशेष वर्ग शहरातील टिळक आळी, दैवज्ञ भवन, नाचणे रोड व जेएसडब्ल्यू पोर्ट लिमिटेडच्या वतीने जयगड येथे घेण्यात आले होते. या विशेष वर्गात एकूण रत्नागिरीतील विविध शाळांतून ४५ मुले सहभागी झाली होती. त्यापैकी ३३ मुलांनी कोल्हापूर येथे झालेल्या ‘प्रोअॅक्टिव्ह अॅबॅकस कॉम्पिटिशन २०१९’मध्ये भाग घेतला. 

या स्पर्धेत पुढील विद्यार्थ्यांनी यश मिळवले. सनान रमजान शेख (तिसरी, मुकुल माधव हायस्कूल, रत्नागिरी), रिद्धी केतन चव्हाण (तिसरी, जीजीपीएस, रत्नागिरी), जेएसडब्ल्यू पोर्ट येथील समर कॅम्प अॅबॅकस कोर्समधील अथर्व रवींद्र सागवेकर (पाचवी, माध्यमिक विद्यालय, वरवडे भाग वाटद खंडाळा), रुणाल सुरेश कोलकांड (पाचवी माध्यमिक विद्यालय, वरवडे भाग वाटद खंडाळा), सुमित राजेंद्र पावसकर (सातवी, जयगड माध्यमिक विद्यामंदिर, जयगड) या विद्यार्थ्यांनी ट्रॉफी पटकावली. 

रत्नागिरी सेंटरमधील ज्ञानदा योगेश नातू, सोहम राजेंद्र परब, सुस्मित सचिन दळवी, शौर्य प्रमोद उपाध्याय, सोहम नीलेश कर्लेकर, आदित्य अशोक गोसावी, सार्थक अनिल भोळे, श्रेयस अरविंद शिंदे, पलश किशोर जैन, जिज्ञेश संजय शिंदे, आयुष मनोज मयेकर, पृथा मनोज हळदणकर, मांगल्य मनोज पाध्ये, तन्वी सुधीर कर्लेकर, जयगड सेंटरमधून राजलक्ष्मी मंगेश साळवी, श्रीनाथ जयेंद्र शिंदे, झैनब मुनाफ राजवाडकर, पार्थ दिनेश माने, देवश्री मंगेश साळवी, साहिल अल्ताफ राजवाडकर, निहार कमलेश बापट, नावाजिश नियाझअली गुहागरकर आदी विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह अनुक्रमे अ, ब, क, ड, ई गटांमध्ये सुवर्णपदक मिळविले.

या परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना एज्युकेयर प्रोअॅक्टिव्ह अॅबॅकसच्या संचालिका सोनल सावंत मार्गदर्शन लाभले. प्रोअॅक्टिव्ह अॅबॅकस कंपनीचे संचालक अध्यक्ष गिरीश करडे, संचालक अजय मणियार, एज्युकेयर फाउंडेशनचे संचालक स्वप्नील सावंत तसेच पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.

गणिताच्या माध्यमातून अंकगणितातील कौशल्य विकसित करण्यासाठी साठी अबॅकस तंत्राचा वापर केला जातो. मुलांची गणितातील भीती निघून जावी म्हणून अबॅकस शिकवलं जाते. यामुळे विद्यार्थी अंकगणितात हुशार होतात, त्यांची स्मरणशक्तीत व एकाग्रतेत वाढ होते, आत्मविश्वास वाढतो, वैचारिक व बौद्धिक क्षमतेचा विकास होतो. 

रत्नागिरी एज्युकेयर प्रोअॅक्टिव्ह अबॅकस सेंटरची सुरवात झाली याला विविध शाळातील विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अल्पावधीतच एज्युकेयर प्रोअॅक्टिव्ह अबॅकस सेंटरने मुलांना विविध स्पर्धेत उतरवून घवघवीत यश संपादन केले आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search