Next
‘कठोर शिक्षेमुळे योग्य तो संदेश’
प्रेस रिलीज
Wednesday, November 29 | 05:55 PM
15 0 0
Share this story

रावसाहेब पाटील-दानवेमुंबई : ‘कोपर्डी येथील मुलीच्या बलात्कार व खूनप्रकरणी न्यायालयाने तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यामुळे त्या पीडीतेला न्याय मिळाला आहे. भविष्यात असे गुन्हे घडू नये यासाठी या कठोर शिक्षेमुळे योग्य तो संदेश दिला गेला आहे,’ अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी बुधवारी (२७ नोव्हेंबर) व्यक्त केली.
 
ते म्हणाले, ‘कोपर्डी येथे गेल्यावर्षी ही घटना घडल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त झाला होता. पोलिसांनी आरोपींना तातडीने अटक केली. या खटल्याचे कामकाज वेगाने व्हावे यासाठी सरकारने प्रयत्न केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक लक्ष देऊन तपास व खटल्याच्या कामी पाठपुरावा केला.’

ते पुढे म्हणाले, ‘सरकारतर्फे विशेष नियुक्ती केलेल्या ॲड. उज्ज्वल निकम यांनी अत्यंत कौशल्याने बाजू मांडली. न्यायालयाने आज तीनही आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावल्यामुळे न्याय झाला आहे. आपण तपास यंत्रणा व ॲड. उज्ज्वल निकम यांचे अभिनंदन करतो.’

ॲड. माधवी नाईकभाजपा महिला मोर्चाच्या ॲड. माधवी नाईक म्हणाल्या, ‘कोपर्डी प्रकरणी तीनही आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावणारा निर्णय हा न्यायालये व पोलीस या दोघांवरील विश्वास दृढ करणारा आहे. या प्रकरणात पोलिसांनी कौशल्याने तपास करून खटल्याचा पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी पुढाकार घेतला.’

त्या पुढे म्हणाल्या, ‘दिल्लीच्या निर्भया प्रकरणानंतर सामुहिक बलात्काराच्या गुन्ह्याची व्याख्या व शिक्षेची व्याप्ती वाढवली गेली. कायद्यातील बदललेल्या तरतुदींचा लाभ होऊन महाराष्ट्रातील निर्भयाला न्याय मिळाला. एक लढाई जिंकली मात्र समाजातील ही विकृती आणि क्रौर्य हद्दपार करण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन हे आव्हान पेलण्याची आवश्यकता आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link