Next
फ्रान्सकडून सिमरन जेठवानी यांना मानद डॉक्टरेट
BOI
Saturday, February 02, 2019 | 03:24 PM
15 0 0
Share this story

सामाजिक कार्यकर्त्या सिमरन जेठवानी यांना फ्रान्स दूतावासातर्फे मानद डॉक्टरेट प्रदान करताना मिसेस युनिव्हर्स नेहा त्यागी व फ्रान्स दूतावासातील अधिकारी जॉन थॉमस.

पुणे : ओवायई फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा आणि पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या सिमरन जेठवानी यांना फ्रान्स दूतावासाकडून समाजकार्याबद्दल मानद डॉक्टरेट देऊन सन्मानित करण्यात आले आहे. फ्रान्स दूतावासातील अधिकारी जॉन थॉमस आणि मिसेस युनिव्हर्स नेहा त्यागी यांच्या हस्ते सिमरन जेठवानी यांचा नुकताच प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

सिमरन जेठवानी
वयाच्या नवव्या वर्षापासूनच समाजकार्याशी जोडल्या गेलेल्या सिमरन अनेक संस्थांबरोबर काम करत आहेत. बी. कॉम, डीटीएल, एलएलबीचे शिक्षण घेतलेल्या सिमरन जेठवानी टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्टियम, क्रिप्स फाउंडेशन, रोटरी क्लब, इनरव्हील क्लब, सिंधी समाज संस्था अशा विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रीय आहेत. स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती उपक्रमाच्या दोन विक्रमाची नोंद ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली आहे.

यासह सिमरन जेठवानी गेल्या अनेक वर्षांपासून अंध मुलांसाठी काम करत असून, बिहारमध्ये त्यांनी लष्करासोबत दुष्काळ निवारणासाठी काम केले. साधू वासवानी मिशनमध्ये त्या कार्यरत आहेत. त्याचबरोबर माळीण गावात कलाग्राम वसवण्यात; तसेच हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पात त्यांनी योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत फ्रान्स दूतावासाकडून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. 

‘या सन्मानाने खूप आनंद झाला आहे. यामुळे आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे,’ अशी भावना सिमरन जेठवानी यांनी व्यक्त केली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link