Next
‘जीजीपीएस’चा निकाल १०० टक्के
BOI
Saturday, June 08, 2019 | 06:15 PM
15 0 0
Share this article:

सानिका केळकरसिद्धेश सावंतरत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१९मध्ये दहावीची परीक्षा घेण्यात होती. या परीक्षेसाठी येथील श्रीमान गंगाधर गोविंद इंग्लिश मीडियम स्कूलमधून (जीजीपीएस) १७९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. यातील ४० हून अधिक मुलांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहेत. 

कौशिक रेडीजसानिका अतुल केळकर व सिद्धेश सुशील सावंत या विद्यार्थ्यांनी ९७.२० टक्के गुण मिळवत शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळविला. कौशिक सत्यवान रेडीज याने ९७ टक्के गुण मिळवत द्वितीय, तर रिधिमा राजेंद्र भाटकर आणि चैतन्य विराज परब यांनी ९६.८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. 

रिधिमा भाटकरचैतन्य परबरत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन, सचिव सतीश शेवडे यांच्यासह सोसायटीचे सर्व पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक प्रतापसिंह चव्हाण, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांकडून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
योगेश कदम About 8 Days ago
अभिनंदन जी जी पी एस
0
0

Select Language
Share Link
 
Search