Next
लिमरास शेखची १७ वर्षांखालील क्रिकेट संघात निवड
प्रेस रिलीज
Thursday, January 10, 2019 | 02:52 PM
15 0 0
Share this story

कोल्हापूर : येथील लिमरास शेख याची महाराष्ट्राच्या १७ वर्षांखालील क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. जानेवारी २०१९ मध्ये होणाऱ्या नॅशनल क्रिकेट टूर्नामेंटमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी लिमरास सज्ज झाला आहे.

लिमरास हा कोल्हापूरच्या विबग्योर हायमध्ये नववीत  शिकणारा विद्यार्थी आहे. वयाच्या अवघ्या चार वर्षांपासून क्रिकेटमध्ये समरसून गेलेला लिमरास मिडल-ऑर्डर स्ट्राइक बॅट्समन आणि लेग स्पिनर असून, त्याच्या अंगी असलेले अष्टपैलूत्व या महिन्यात रंगणाऱ्या टूर्नामेंटमध्ये त्याच्या टीमचे भाकीत ठरविण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका वठवेल.  

‘मला कधी महाराष्ट्राच्या १७ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट टीममध्ये खेळण्याची संधी मिळेल, असा विचार मला स्वप्नातदेखील आला नव्हता. हे सर्व श्रेय माझे प्रशिक्षक मिहीर देवपूजे आणि सुरज जाधव यांना जाते. त्यांनी मला लक्ष केंद्रित करण्यासाठी, तंत्र सुधारण्यासाठी आणि माझ्या दोषांवर मेहनत घेण्यासाठी बरीच मदत केली. मागील सहा वर्षांपासून त्यांनी जे साह्य केले, त्याशिवाय मला इथपर्यंत पोहोचताच आले नसते. मी माझे पालक आणि बहिणींचेदेखील आभार मानतो. मी हताश झाल्यावर त्यांनी वेळोवेळी माझे मनोधैर्य वाढवले. मला एक दिवस विराट कोहली बनायचे आहे आणि भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर न्यायचे आहे,’ असे विचार लिमरासने मांडले.

त्याच्या कामगिरीविषयी बोलताना विबग्योर हायचे प्राचार्य टी. बालन म्हणाले, ‘आमचा आनंद शब्दांत मांडण्यासाठी शब्द अपुरे आहेत. व्यवस्थापनापासून शिक्षकांपर्यंत संपूर्ण विबग्योर परिवाराला लिमरासचा अभिमान आहे. आमच्या शाळेच्या (पीएसए) पोस्ट स्कूल अॅक्टिव्हीटी प्रोग्राममध्ये सहभागी होऊन त्याच्या क्रिकेट कारकिर्दीचा शुभारंभ झाला होता. इतक्या कोवळ्या वयात त्याने खेळाप्रती दाखवलेली निष्ठा कौतुकास पात्र आहे. लिमरासने खेळातील नैपुण्य सांभाळून अभ्यासात कुचराई न करता ती कामगिरीही उत्तम बजावली आहे, हे निश्चितपणे दखलपात्र आहे. त्याने अभ्यास आणि क्रिकेटमधील समतोल चांगला राखला आहे.’
 
या प्रसंगी त्याचावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link