Next
मुलांनी घेतली पत्रांच्या प्रवासाची माहिती
मिलिंद जाधव
Saturday, December 01 | 04:43 PM
15 0 0
Share this story

भिवंडी : परिसर भेट या शालेय उपक्रमांतर्गत ठाण्याच्या भिवंडी तालुक्यातील पडघा परिसरातील बोरिवली, आनंदनगर आदिवासी पाड्यातील जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी पडघा पोस्ट ऑफिसला भेट दिली. 

एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे व एका शहरातून दुसऱ्या शहरात आणि एका देशातून दुसऱ्या देशात पत्र कशा पद्धतीने पोहोचते, पत्रांचे वेगवेगळे प्रकार, आकार कोणते, पूर्वीपासून पत्रव्यवहाराच्या चालत आलेल्या पद्धती आणि नवीन पद्धती याविषयी मुलांनी माहिती घेतली. 

पडघा पोस्ट ऑफिसचे उप पोस्टमास्तर राजेंद्र वाळकुराव यांनी साध्या व सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनात अभ्यासक्रमातून विद्यार्थी नेहमीच माहिती मिळवत असतात; पण विविध क्षेत्रांतील प्रत्यक्ष कामकाज कशा पद्धतीने चालते हे कळण्यासाठी प्रत्येक महिन्याला विद्यार्थ्यांसाठी ‘परिसर भेट’ हा शालेय उपक्रम राबविण्यात येत असतो. त्याअंतर्गत परिसरातील विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेट देण्यात येते, असे बोरिवली, आनंद नगर आदिवासी पाडा जि. प. मराठी शाळेचे मुख्याध्यापक बनाजी दरेकर यांनी सांगितले. आम्ही शालेय उपक्रमातून नेहमीच विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील माहिती प्रत्यक्ष भेटीतून देत असतो, असे शिक्षक प्रकाश सोनावणे यांनी सांगितले.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link