Next
‘ऋतुरंग’च्या रौप्यमहोत्सवानिमित्त ‘ग्रंथाली’ची रसिकांसाठी विशेष योजना
प्रेस रिलीज
Monday, October 09 | 06:37 PM
15 0 0
Share this story



मुंबई :
‘ऋतुरंग’चा हा सलग २५वा अंक असून, मनातील आठवणींना वाट मोकळी करून देणारे मान्यवरांचे लेख हे त्याचे वैशिष्ट्य आहे. त्यात गुलजार, लता मंगेशकर, डॉ. उदय निरगुडकर, गिरीश कुबेर, संदीप वासलेकर, राजीव खांडेकर, सौमित्र, अशोक कोठावळे यांसारख्या मान्यवरांचा समावेश असून, २७२ पानांच्या या अंकाची किंमत २०० रुपये इतकी आहे.

‘ग्रंथाली’तर्फे दर वर्षी काही दर्जेदार दिवाळी अंक आणि पुस्तके एकत्र करून त्यांचा संच सवलतीच्या दरात रसिकांना उपलब्ध करून दिले जातात. यंदा त्या संचात ‘ऋतुरंग’, ‘उत्सव नात्यांचा’ आणि ‘शब्द रुची’ या तीन दिवाळी अंकांसोबत अरुण शेवते यांनी संपादित केलेली ‘आठवणींचे असेच असते’ (आठवणी आपल्या मनात रुंजी घालत असतात. आठवणी या त्या काळचे प्रतिबिंब असते), ‘मला उमगलेला पुरुष’ (‘स्त्री’ला पुरुष कसा उमगतो हे उलगडून दाखवणारे पुस्तक), ‘मी स्त्री आहे म्हणून’ (‘स्त्री’ला स्त्री आहे म्हणून काय वाटते याचा शोध घेणारे पुस्तक) ही तीन पुस्तके आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे ‘मागे वळून पाहताना’ हे चिंतनपर ललित गद्य असा एक हजार २०० रुपये किंमतीचा ऐवज केवळ ८०० रुपयांत उपलब्ध करून देण्यात येत आहे. संच कुरिअरने पाठविण्यासाठी प्रत्येकी ८० रुपये स्वतंत्र शुल्क आकारण्यात येईल, असेही ‘ग्रंथाली’तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

‘झी मराठी’ आणि ‘ग्रंथाली’ची संयुक्त निर्मिती असणारा ‘उत्सव नात्यांचा’ हा पहिलावहिला दिवाळी अंक या संचाचे खास वैशिष्ट्य ठरले आहे. गेली १८ वर्षे मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘झी मराठी’ची जडणघडण, वर्तमान आणि भविष्य यांचा विविधांगी आढावा घेणारा हा लेख मान्यवर, विचारवंत आणि कलावंतांच्या साहित्याने, आठवणींनी आणि चिंतनपर साहित्याने सजलेला आहे. त्यात शारदा सुंदर, नितीन वैद्य, भारतकुमार राऊत, माधवी मुटाटकर, जयदेव डोळे आणि सचिन पिळगावकर, महेश मांजरेकर यांच्यापासून ‘झी’चे सर्व कलाकार, लेखक, निर्माते गीतकार अशा अनेक मान्यवरांचा समावेश आहे. सुप्रसिद्ध नाटककार प्रशांत दळवी यांनी अंकाचे संपादन केले असून, २७२ पानांच्या या अंकाची किंमत केवळ १०० रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

या वर्षीचा ‘शब्द रुची’चा दिवाळी विशेषांक नेहमीप्रमाणे विविधांगी साहित्याने नटलेला आणि संग्राह्य असा झाला आहे. डॉ. वीणा सानेकर यांनी या अंकाचे संपादन केले असून, वसंत आबाजी डहाके, उषा मेहता, महेंद्र तेरेदेसाई, डॉ. प्रतिमा इंगोले, वसंत लिमये, जयदेव डोळे, दिनकर गांगल, प्रवीण बांदेकर असे अनेक मान्यवर या अंकाचे शिलेदार आहेत. ‘ग्रंथाली’चे आधारस्तंभ आणि चतुरस्र लेखक अरुण साधू यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना वाहिलेली आदरांजली आणि त्याबरोबरच अन्य मान्यवरांच्या कथा, कविता, ललित, परिसंवाद, विविध विषयांवरील चर्चा अशा साहित्याने नटलेला हा २०० पानांचा अंक स्वतंत्रपणे दीडशे रुपये किंमतीत उपलब्ध करून देण्यात आला आहे.

‘ग्रंथाली प्रकाशनने भेट स्वरूपात उपलब्ध करून दिलेले हे संस्कृतीसंचित प्रत्येक रसिक माणसाच्या संग्रही राहील आणि त्याला त्याच्या सांस्कृतिक श्रीमंतीची आठवण करून देईल,’ असा विश्वास सुदेश हिंगलासपूरकर यांनी व्यक्त केला आहे.

हा संच पुढील ठिकाणी उपलब्ध असेल : बुकगंगा (पुणे), अक्षरधारा (पुणे), ज्योती स्टोअर्स (नाशिक), साहित्ययात्रा (ठाणे), मॅजेस्टिक बुक स्टॉल (गिरगाव/शिवाजी मंदिर/ठाणे), मॅजेस्टिक बुक हाउस (दादर/विलेपार्ले/डोंबिवली), आयडियल पुस्तक त्रिवेणी (दादर).
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link