Next
‘९१ स्प्रिंगबोर्ड’चे पुण्यात को-वर्किंग हब
प्रेस रिलीज
Saturday, October 20 | 03:24 PM
15 0 0
Share this story

पुणे : भारतातील सर्वांत मोठ्या आणि सर्वात सक्रिय को-वर्किंग ‘९१ स्प्रिंगबोर्ड’ या समुदायाने अलीकडेच पुण्यात एक नवीन को-वर्किंग हब सुरू करण्याची घोषणा केली.

ही या कम्युनिटीची सर्वांत मोठी को-वर्किंग स्पेस असणार आहे. ज्याचे क्षेत्रफळ ५० हजार वर्गफुटपेक्षा जास्त असून, एक हजार १०० पेक्षा जास्त सदस्यांच्या बैठकींची व्यवस्था त्यात असेल. ही सुविधा क्रिएटिसिटी या पुण्यातील एक वेगळीच संकल्पना असलेल्या शॉपिंग मॉलमध्ये असून, एखाद्या मॉलमधला हा ‘९१ स्प्रिंगबोर्ड’चा पहिलाच सेटअप आहे आणि गोव्यानंतर टायर वन शहरातील त्यांचे हे दुसरे हब असणार आहे.

येरवडासारख्या शहरातील मोक्याच्या ठिकाणी, गोल्फ कोर्स रोडसमोर एका मुख्य क्षेत्रात हा नवीन हब असणार आहे. येथून पुण्यातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणांकडे आणि व्यापार-केंद्रांकडे जाणे सुलभ आहे. पुणे विमानतळ इथून केवळ ३.७ किमी, तर रेल्वे स्टेशन फक्त ५.४ किमी लांब आहे. शिवाय पुणे विद्यापीठ क्रिएटिसिटी कँपपासून ९.४ किमी अंतरावर असल्यामुळे विद्यार्थ्यांना आणि होतकरू उद्योजकांना आपल्या कौशल्यांना धार करण्यासाठी आणि ऑफरवर इव्हेंट आणि नेटवर्किंग संधींचा लाभ घेण्यासाठी ही जागा सोयीची ठरू शकते. पूनावाला बिझनेस बे (१.५ किमी), सेरेब्रम आयटी पार्क (३.४ किमी) आणि आयबीएम, नियती युनिट्री (२.१ किमी) ही येथून जवळच असलेली व्यापार केंद्रे आहेत.

‘९१ स्प्रिंगबोर्ड’चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद वेमुरी म्हणाले, ‘व्यावसायिक, व्यापार आणि स्टार्टअप्ससाठी एक सशक्त, प्रफुल्लित आणि सुसंबद्ध नेटवर्क तयार करण्याचे आमचे लक्ष्य आहे, ज्याच्यामुळे संसाधने, संधी आणि विचारांच्या मुक्त संचारास प्रोत्साहन मिळून शहराच्या व्यावसायिकतेस एक सकल दृढता येईल. पुण्याच्या ईकोसिस्टममध्ये शिरकाव करण्यामागील आमचा उद्देश आहे भागीदारीद्वारे, मेंटर्सचे एक सशक्त नेटवर्क तयार करणे; तसेच पुण्याच्या ईकोसिस्टमला आमच्या भारतभरातील बिझनेस लीडर आणि तज्ज्ञांचा लाभ मिळवून देऊन होतकरू उद्योजकांना आधार देणे’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link