Next
‘मणिकर्णिका’चे पहिले गाणे प्रदर्शित
‘विजयी भव..’ गाण्याला यू-ट्यूबवर २४ तासांत सव्वा लाखाहून अधिक व्ह्यूज
BOI
Thursday, January 10, 2019 | 06:12 PM
15 0 0
Share this article:


मुंबई :  ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी’ या २०१९च्या पहिल्या भव्यदिव्य चित्रपटाबद्दल सध्या बॉलिवूड वर्तुळातच नव्हे, तर सर्वत्र चर्चा सुरू आहे. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या चित्रपटाचे ‘विजयी भव..’ हे पहिले गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. चित्रपटाच्या गाण्याचे प्रदर्शन अतिशय भव्यतेने करण्यात आले, यावरूनच चित्रपटाच्या भव्यतेची कल्पना केली जाऊ शकते. यू-ट्यूबवर या गाण्याला २४ तासांत सव्वा लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

झाशीच्या राणीच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटात अभिनेत्री कंगना रनौट झाशीच्या राणीच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अतुल कुलकर्णी तात्या टोपेंच्या, जिशू सेनगुप्ता गंगाधर राव यांच्या, सुरेश ओबेरॉय बाजीराव पेशव्यांच्या भूमिकेत दिसतील, तर मराठमोळा अभिनेता वैभव तत्त्ववादी पुरणसिंह याच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडेही या वेळी उपस्थित होती. अंकिता या चित्रपटात झलकारी बाईच्या भूमिकेत दिसणार आहे.  

कंगना रैनोतमुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित या सोहळ्यात चित्रपटातील मुख्य कलाकार कंगना रनौट, गीतकार प्रसून जोशी आणि संगीतकार त्रयी शंकर-एहसान-लॉय यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते. यापूर्वी चित्रपटाचा ट्रेलरही अशाच भव्यतेने प्रकाशित करण्यात आला होता. या कार्यक्रमात चित्रपटाची संपूर्ण टीम अतिशय उत्साहात असल्याचे दिसून आले. 

संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांनी ‘विजयी भव..’ या गाण्याच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने, चित्रपटाच्या संगीताबद्दल आलेल्या समस्या आणि त्यांच्यासमोरील आव्हाने यांचे अनुभव सांगितले. एक स्त्री म्हणून आपल्याला या चित्रपटाने आणखी सशक्त बनवले असल्याची भावना अभिनेत्री कंगना रनौटने व्यक्त केली आहे. यू-ट्यूबवर हे गाणे उपलब्ध करण्यात आले असून, यू-ट्यूबवरील ट्रेंडिंगमध्ये हे गाणे सध्या २४व्या क्रमांकावर आहे. याशिवाय या गाण्याने २४ तासांत एक लाख ३० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search