Next
गरीब व गरजू विद्यार्थ्यांना पुण्यात वसतिगृह प्रवेश
प्रेस रिलीज
Friday, June 08, 2018 | 03:54 PM
15 0 0
Share this story

पुणे : येथे उच्चशिक्षणासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना अल्पदरात निवास, भोजनासाठी येथील विद्यार्थी साहाय्यक समितीच्या वसतिगृहामध्ये प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे.

गेली साठ वर्ष ग्रामीण विद्यार्थ्यांना पुण्यात अल्प दरात निवास, भोजन आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी ही संस्था काम करीत आहे. संस्थेची पाच सुसज्ज वसतिगृह असून, सुमारे ४५० विद्यार्थी आणि ३०० विद्यार्थिनी येथे राहतात. उच्च शिक्षणातील विविध विद्याशाखांसाठी पुण्यात प्रवेश मिळाल्यावर समितीमध्ये प्रवेश मिळू शकेल. प्रवेश अर्जासोबतची कागदपत्रे तपासून मुलाखत घेतली जाते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ‘कमवा व शिका योजने’त सहभाग नोंदवणे, व्यक्तिमत्त्व विकासाच्या विविध उपक्रमांत सहभाग नोंदवणे अनिवार्य असते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात भर पडल्याचे येथील कार्यकर्त्यांचे व असंख्य माजी विद्यार्थ्यांचे निरीक्षण आहे. या संस्थेचे कामकाज समाजातून मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर सुरू असल्याने येथील नियमांची काटेकोर अमंलबजावणी होते.

‘समितीचे प्रवेश अर्ज व माहितीपत्रक १ जूनपासून ऑनलाईन संस्थेच्या वेबसाईटवर तसेच कार्यालयात (सकाळी ११ ते सायं. ४ वा.) मिळतील. गरजू विद्यार्थी–विद्यार्थीनींनी संस्थेच्या सुविधांचा अवश्य लाभ घ्यावा,’ असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

प्रवेश अर्जासाठी संपर्क व संस्थेचा पत्ता : मुलींचे वसतिगृह- विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे, डॉ. अ. श. आपटे वसतिगृह, ११८२/१/४, शिवाजीनगर, फर्ग्युसन कॉलेज रोड, पोलिस ग्राऊंड जवळ, बॅंक ऑफ महाराष्ट्र ’यशोमंगल’ शेजारी, पुणे – ४११ ००५.
संपर्क : (०२०) २५५३ ३६३१.
मुलांचे वसतिगृह : विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे, लजपतराय विद्यार्थी भवन, १०३अ, शिवाजी हौ. सो. मागे, सेनापती बापट रस्ता, पुणे ४११ ०१६.
संपर्क : (०२०) २५६३ ९३३०.
वेबसाइट : www.samiti.org
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
suresh bajrang birsane About 173 Days ago
Mi sadhya 11vt aahe aani mala upsc crack karayachi aahe aani mala ya hostel madhye pravesh milel ka
0
0

Select Language
Share Link