Next
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे विज्ञान प्रदर्शन
विद्यार्थ्यांनी उलगडले प्रयोगातून विज्ञान
BOI
Tuesday, March 05, 2019 | 01:51 PM
15 0 0
Share this story


पुणे : विज्ञान दिनानिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे नवीन मराठी शाळेत ट्रस्टच्या जय गणेश पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या विज्ञान प्रकल्प प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. विद्याधर बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात ५० पेक्षा अधिक नाविन्यपूर्ण प्रकल्प मांडण्यात आले होते. या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

या विज्ञान प्रदर्शनातून मुलांना एरवी कंटाळवाणे वाटणारे विज्ञान प्रयोगातून अगदी सहज सोपे होऊन जाते याचा प्रत्यय येत होता. मुले अगदी सोप्या भाषेत आपला प्रयोग समजावून सांगत होती. विज्ञानातील विविध नियम, त्यांचा प्रत्यक्ष जीवनातील वापर स्पष्ट करणाऱ्या या प्रकल्पांमुळे त्यांच्या विज्ञानातील संकल्पना अगदी स्पष्ट झाल्याचे जाणवत होते. मुलांनी नाण्यांच्या मनोऱ्यावर उभी राहणारी पट्टी, पर्यावरण रक्षणासाठी उपयुक्त ठरणारे गांडूळखत, तुरटीचा वापर करून पाणी कसे शुद्ध करता येते, भूकंप कसा होतो, पवनचक्की, हायड्रोजन क्रेन असे अनेक प्रयोग मांडले होते. 

(विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध विज्ञान प्रयोगांच्या प्रदर्शनाची झलक दाखविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link