Next
‘महिंद्रा’तर्फे ‘फुरिओ’चे अनावरण
प्रेस रिलीज
Wednesday, July 25, 2018 | 04:48 PM
15 0 0
Share this story

चाकण : ‘महिंद्रा’च्या ट्रक अँड बस डिव्हिजनने (एमटीबीडी) ‘फुरिओ’ या इंटरमीडिएट कमर्शिअल व्हेइकल्सच्या (आयसीव्ही) नव्या रेंजचे अनावरण केले. ‘महिंद्रा’चे ५००हून अधिक इंजिनीअर, १८० पुरवठादार यांचे एकत्रित प्रयत्नातून तयार झालेल्या ‘महिंद्रा फुरिओ’मध्ये ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

यानिमित्त बोलताना, महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पवन गोएंका म्हणाले, ‘आम्ही नव्या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी आणि परिपूर्ण रेंज असलेली कमर्शिअल व्हेइकल कंपनी बनण्यासाठी सज्ज असल्याने, आयसीव्ही ट्रकची ‘फुरिओ’ ही नवी रेंज दाखल करणे, हा आमच्या ट्रक व बस व्यवसायासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. पिनइन्फारिनापासून प्रेरित डिझाइन असलेली ‘फुरिओ’ रेंज आमच्यासाठी व खरेतर या उद्योगासाठी मोठे परिवर्तन आणणार आहे; तसेच, नव्या ट्रकमध्ये अतिशय सुरक्षित, अत्यंत अर्गोनॉमिक व आरामदायी केबिन असणार असून, त्यामुळे नवी प्रमाणके निर्माण केली जाणार आहेत. ब्लेझो एचसीव्ही सीरिजप्रमाणे, आयसीव्हीची फुरिओ रेंज कामगिरी, अर्निंग्स या बाबतीत नवे बेंचमार्क निर्माण करणार आहे आणि ग्राहकांना उत्तम मूल्ये देणार आहे.’

आयसीव्ही रेंज दाखल करण्याबद्दल बोलताना, महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या ऑटोमोटिव्ह सेक्टरचे अध्यक्ष राजन वधेरा म्हणाले, ‘ग्राहकांकडून मिळालेल्या प्रतिसादाच्या अनुषंगाने ‘महिंद्रा फुरिओ’ची निर्मिती केलेली असल्याने, ‘फुरिओ’ हे भारतीय ग्राहकांसाठी सर्वोत्तम उत्पादने तयार करण्याच्या ‘महिंद्रा’च्या क्षमतेचे प्रतिक आहे. ‘महिंद्रा’साठी व्हॉल्युम व बाजारहिस्सा यामध्ये लक्षणीय वाढ करणारी ‘ब्लेझो’ ही ‘महिंद्रा’ची अतिशय यशस्वी ट्रकची एचसीव्ही रेंज दाखल केल्याच्या पार्श्वभूमीवर ‘फुरिओ’ दाखल करण्यात आली आहे. आयसीव्हीची ही नवी रेंज दाखल केल्याने, एमटीबी ही भारतातील सीव्ही क्षेत्रातील परिपूर्ण ट्रकिंग सोल्यूशन देणारी कंपनी ठरणार आहे.’

महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या महिंद्रा ट्रक व बस व कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट डिव्हिजन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद सहाय म्हणाले, ‘उच्च अर्निंग्स, वापरण्याचा कमी खर्च, उत्तम सुरक्षितता, सुधारित अर्गोनॉमिक्स, आरामदायी राइड व सर्वात महत्त्वाचे म्हणजे मालकीचा जागतिक दर्जाचा अनुभव देणारा आदर्श ट्रक भारतातील आयसीव्ही ग्राहकांना हवा आहे. आमची नवी फुरिओ रेंज याच घटकांवर आधारित आहे आणि लवकरच ती आयसीव्ही ग्राहकांची पसंती मिळवेल, असा विश्वास आहे. महिंद्रा ट्रक अँड बस डिव्हिजनमध्ये आम्ही आमच्या पोर्टफोलिओमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत आणि ग्राहकांना विशिष्ट आश्वासने दिली आहेत, यामुळे या क्षेत्रापेक्षा अधिक वेगाने प्रगती करणे आम्हाला शक्य झाले आहे. आगामी काळात आम्ही आयसीव्ही क्षेत्राच्या व्यवसाय करण्याच्या पद्धतीमध्ये नवे बदल आणणार आहोत आणि या श्रेणीमध्ये लक्षणीय हिस्सा साध्य करण्याचा प्रयत्न करणार आहोत.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link