Next
सामान्यांतील असामान्यांसाठी ‘अ. क. स.’ पुरस्कार
अभिनेता अंशुमन विचारे यांची संकल्पना
BOI
Saturday, March 09, 2019 | 03:06 PM
15 0 0
Share this story

ठाणे : समाजातल्या सर्वसामान्य व्यक्तींमध्ये असलेल्या कर्तृत्वाला सलाम करण्याच्या उद्देशाने अभिनेता अंशुमन विचारे यांनी ‘अ. क. स.’ म्हणजे ‘असामान्य कर्तृत्वाला सलाम’ या सामाजिक पुरस्कारांची संकल्पना मांडली होती. येत्या १४ मार्च रोजी हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कारांचे हे पहिले वर्ष असून, यंदा एकूण पाच पुरस्कार दिले जाणार आहेत. 

समाजात विविध प्रकारे कर्तृत्व बजावणाऱ्या सामान्य व्यक्तींचा प्रसिध्द सिने-नाट्य कलावंतांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. गुरुवारी, १४ मार्च २०१९ रोजी सायंकाळी चार वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. या सोहळ्यास दिग्गज कलाकार महेश कोठारे, अरुण नलावडे, उषा नाडकर्णी, सुधाकर चव्हाण, विजय गोखले, पंढरीनाथ कांबळे, समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, गुरुनाथ मिठबावकर, विशाखा सुभेदार, नितीन लाड, अरुण कदम आदींच्या उपस्थितीत मनोरंजनाच्या भरगच्च कार्यक्रमांसह हा सोहळा रंगणार आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अंशुमन विचारे आणि दिग्दर्शक राजेंद्र पवार यांनी या पुरस्काराची घोषणा केली आणि यासाठी समाजाच्या सर्व स्तरांतून अर्ज मागवले. या आवाहनाला विविध विभागांतून भरघोस प्रतिसाद मिळाला. त्यातून पाच जणांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. 

‘सर्व कलारसिक व ठाणेकरांनी या सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा,’ असे आवाहन अभिनेते अंशुमन विचारे यांनी केले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link