Next
गेल्या चार वर्षांत शहर विकासाला गती
प्रेस रिलीज
Thursday, June 27, 2019 | 05:34 PM
15 0 0
Share this article:

नवी दिल्ली : गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्रालयाच्या प्रधानमंत्री आवास योजना (शहरी), अमृत आणि स्मार्ट सिटी अभियानामुळे देशातील शहरांचे रंगरूप बदलले आहे. या योजनांमुळे गेल्या चार वर्षांत शहर विकासाला गती मिळाली असून नागरिकांचे जीवनही सुकर होत आहे.

शहरी पुनरुत्थानासाठी २००४ ते २०१४ दरम्यान १.५७ लाख कोटी रुपयांची एकूण गुंतवणूक झाली, तर २०१४ ते २०१९ या कालावधीत १०.३१लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. तुलनात्मक वाढ ५५४ टक्के आहे. पीएमएवाय (शहरी), अमृत आणि स्मार्ट सिटी अभियानातील गुंतवणूक जवळपास आठ लाख कोटी आहे. अभियानांतर्गत उद्दिष्टपूर्ती आणि वेळमर्यादा यात मंत्रालय अग्रेसर राहिले आहे.

शहरी गरीबांना छत मिळवून देण्यासाठी असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (शहरी) ४.८३ लाख कोटी रुपयांची एकूण गुंतवणूक असलेली ८१ लाखांहून अधिक घरे मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी ४८ लाख घरे निर्मितीच्या विविध टप्प्यांवर असून, २६ लाख घरे पूर्ण झाली आहेत आणि ती हस्तांतरीत झाली आहेत. १३ लाखांहून अधिक घरे नवतंत्रज्ञानाचा वापर करून बांधली जात आहेत. १.२६ लाख कोटी रुपयांचे केंद्रीय सहाय्य यासाठी मंजूर करण्यात आले असून, ५१ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरीत करण्यात आली आहे.

क्रेडिट लिंक सबसिडी स्कीमअंतर्गत वर्षाला १८ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या मध्यम उत्पन्न गटातल्या कुटुंबांना प्रथमच निधी पुरवला जात आहे. २००५ ते २०१९ या कालावधीत ६.३२ लाखांहून अधिक व्यक्तींनी त्याचा लाभ घेतला आहे. पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापनात सुधारणा बालके आणि दिव्यांगांना सुलभ जागा आणि बगिचे इत्यादीसाठी ७७ हजार ६४० कोटी रुपये मंजूर करण्यात आले. ६५ हजार कोटी रुपयांचे चार हजार ९१०हून अधिक प्रकल्प अंमलबजावणी पूर्तीच्या विविध टप्प्यांवर आहेत.

जलसुरक्षेसाठी ३३ हजार ९०० कोटी रुपयांच्या एक हजार १३२ प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू आहे. अभियानाच्या अखेरपर्यंत सर्व घरात पाणीपुरवठा असेल. ४६७ अमृत शहरांमधे गुण मानांकनाचे काम पूर्ण झाले आहे. पुणे, हैदराबाद, भोपाळ, इंदूर, विशाखापट्टणम, अमरावती, अहमदाबाद आणि सुरत या आठ नागरी स्थानिक संस्थांनी तीन हजार ४०० कोटी रुपयांचे म्युनिसिपल रोखे जारी केले आहेत. स्मार्ट शहरे अभियानाची सुरुवात २५ जून २०१५ला झाली. शहरी पायाभूत सुविधा मजबूत करणे हा या अभियानामागचा उद्देश आहे. १६ एकात्मिक नियंत्रण आणि आज्ञा केंद्रांद्वारे (आयसीसीसी) नागरिकांना अनेक सुविधा ऑनलाइन देता येत आहे.

एकूण प्रकल्पांपैकी ५७ टक्के म्हणजेच तीन हजार ५८९ प्रकल्पांसाठी ठेके देण्यात आले आहेत. त्यांचे मूल्य एक लाख ३३ हजार ४०७ कोटी रुपये आहे. २५ शहरांमध्ये ८३७ कोटी रुपयांचे स्मार्ट रस्ते पूर्ण करण्यात आले असून, ५९ शहरांमधे काम सुरू आहे. स्मार्ट सौरऊर्जा प्रकल्पांतर्गत १५ शहरांमधले ११३ कोटी रुपयांचे प्रकल्प पूर्ण झाले आहे. स्मार्ट सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प १० शहरांमधे पूर्ण झाले असून, २४ शहरांमधे स्मार्ट पाणी प्रकल्प पूर्ण झाले आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search