Next
‘परवडणाऱ्या घरांना प्रोत्साहन देण्यासाठी हवे सरकारी पाठबळ’
प्रेस रिलीज
Thursday, July 27, 2017 | 05:14 PM
15 0 0
Share this article:

‘क्रेडाई महाराष्ट्र’चे अध्यक्ष शांतिलाल कटारियापुणे : परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीला प्रोत्साहन मिळण्यासाठी विकसकांना विविध योजनांच्या माध्यमातून सरकारी पाठबळ मिळायला हवे. सरकार आणि बांधकाम व्यावसायिक यांनी यासाठी एकत्रित प्रयत्न केले, तरच २०२२पर्यंत सर्वांना हक्काचे घर लाभेल,’ असे मत ‘क्रेडाई महाराष्ट्र’चे अध्यक्ष शांतिलाल कटारिया यांनी व्यक्त केले.

‘क्रेडाई महाराष्ट्र’च्या २० विकसकांनी लखनौ येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘क्रेडाई’च्या (ईसीजीसी) या राष्ट्रीय परिषदेत आपला सहभाग नोंदवला होता. या वेळी ‘परवडणारी घरे’ यावर उपस्थितांना मार्गदर्शन करताना कटारिया बोलत होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा, तसेच कॅबिनेट मंत्री या वेळी उपस्थित होते.

कटारिया म्हणाले, ‘परवडणाऱ्या घरांच्या उभारणीसाठी केंद्र सरकार सकारात्मक आहे. परंतु, अशा घरांची निर्मिती करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना राज्य सरकारकडूनदेखील सहकार्य  प्राप्त झाले तर निश्चितच विकसक स्वतःहून पुढाकार घेतील. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या संपर्कात राहून क्रेडाई याविषयी सक्रिय प्रयत्न करत असून, विकसक आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नाने आपण पंतप्रधान आवास योजनेचे उद्दिष्ट साध्य करू शकू. यात विकसकांचा सिंहाचा वाटा असेल.’

या वेळी ‘रेरा कमिटी’चे सुहास मर्चंट यांनी ‘‘रेरा’ची महाराष्ट्रातील अंमलबजावणी’ याविषयी सादरीकरण केले. महाराष्ट्र राज्य पातळीवर महिला समितीच्या संयोजक म्हणून काम पाहणाऱ्या दर्शना परमार-जैन यांनी महिला सबलीकरण या विषयावर सादरीकरण करून येत्या सहा महिन्यांत देशभरात ७५हून अधिक शहरांत अशा प्रकारच्या महिला समितीची स्थापना करण्याची ग्वाही दिली.

या परिषदेत ‘क्रेडाई’चे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर, आदित्य जावडेकर, सचिन कुलकर्णी, दिलीप मित्तल यांच्यासह ‘क्रेडाई पुणे मेट्रो’चे प्रातिनिधिक पदाधिकारी सहभागी झाले होते. या परिषदेत ‘क्रेडाई’च्या १५०पेक्षा जास्त शहराध्यक्षांनी हजेरी लावली होती. प्रश्नोत्तरांच्या तासातून शंकांचे निरसन, बांधकामविषयक विविध कायद्यांची सविस्तर चर्चा व तज्ज्ञांचे मार्गदर्शन यामुळे ‘क्रेडाई’ची ही परिषद उपस्थितांसाठी फलदायी ठरली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search