Next
हिमायतनगरमध्ये वडाच्या गणपतीजवळ रक्तदान शिबिर
नागेश शिंदे
Tuesday, September 18, 2018 | 04:40 PM
15 0 0
Share this article:



हिमायतनगर :
शहरातील परमेश्वर मंदिरासमोरील मानाच्या वडाच्या गणपतीजवळ गणेशोत्सवानिमित्त १८ सप्टेंबर २०१८ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. या वेळी अनेक युवकांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला.

परमेश्वर मंदिरासमोरील जुन्या विशाल वटवृक्षाखाली मानाचा गणपती शेकडो वर्षांपासून विराजमान झालेला आहे. या गणपती मंडळातर्फे विधायक उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. 



हिमायतनगरचे ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण शक्करगे, नायब तहसीलदार तामस्कर, भाजप तालुकाध्यक्ष विजय नरवाडे, काँग्रेस तालुका अध्यक्ष विकास पाटील-देवसरकर, ‘एसबीआय’चे शाखाधिकारी श्री. पुरोहित, शिवसेनेचे हदगाव-हिमायतनगर विधानसभा संघटक विजय वळसे-पाटील, शहराचे प्रथम नगराध्यक्ष अ. अखिल अ. हमीद , नगरसेवक रामभाऊ ठाकरे, डॉक्टर राजेंद्र वानखेडे, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष फिरोज खान पठाण, संजय माने, बांडेवार अप्पा, प्रसिद्ध व्यापारी मिलिंद जन्नावार, सुभाष शिंदे, अश्रफ भाई, सुभाष पाटील, हनुसिंग ठाकूर, विलास वानखेडे, अमृतराव गोजे, सोपान बोम्पीलवार, जांबुवंत मिराशे, मनोज पाटील आदी मान्यवर आणि गणेशभक्त या कार्यक्रमाला उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेकांनी अहोरात्र मेहनत घेतली. वडाच्या गणपती मंडळाचे व हिमायतनगर येथील बजरंग दलाचे विपुल दंडेवाड, प्रशांत देवकते, रामभाऊ सूर्यवंशी, सुमित कागणे, राहुल नरवाडे, परमेश्वर काळे, गोविंद शिंदे, सचिन माने, गजानन हरडपकर, विकास नरवाडे, आदींसह तालुक्यातील त्यांचा मित्रपरिवार आणि गणेश मंडळाचे कार्यकर्ते व गणेशभक्तांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search