Next
डॉ. जयंत नारळीकर
BOI
Wednesday, July 19, 2017 | 04:00 AM
15 1 0
Share this article:

गणिताचे गाढे अभ्यासक, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्रात अशा विषयांत संशोधन करणारे आणि त्याच वेळी विज्ञान कादंबऱ्यांसह वैविध्यपूर्ण लेखन करणारे वाचकप्रिय लेखक अशी डॉ. जयंत नारळीकर यांची ओळख आहे. त्यांच्या जन्मदिनानिमित्त आज ‘दिनमणी’ सदरात त्यांच्याबद्दल...
.................

१९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूरमध्ये जन्मलेले जयंत नारळीकर हे भारताचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ. भारत सरकारने त्यांच्या वैज्ञानिक कार्याचा उचित गौरव करून त्यांना ‘पद्मविभूषण’ पदवी बहाल केली आहे.

बनारस हिंदू विद्यापीठातून बीएस्सी केल्यानंतर केम्ब्रिज विद्यापीठात उच्च शिक्षण घेऊन अत्यंत हुशार गणितज्ञ म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. तिथे असताना त्यांना १९६२ साली स्मिथ्स पुरस्कार आणि १९६७ साली अॅडम्स पुरस्कारानं गौरवण्यात आलं. किंग्स कॉलेजचे फेलो म्हणून १९७२पर्यंत तिथल्या विद्यापीठात काम करत असताना त्यांनी आपले गुरू फ्रेड हॉइल यांच्याबरोबर खगोलशास्त्रात संशोधन करून ‘बिग-बँग-थिअरी’पेक्षा वेगळा असा ‘स्टेडी-स्टेट-थिअरी’ सिद्धांत मांडला. तो हॉइल-नारळीकर सिद्धांत म्हणून प्रसिद्ध आहे.

१९७२नंतर भारतात परत येऊन त्यांनी १९८९पर्यंत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या ख्यातनाम संस्थेमध्ये अॅस्ट्रोफिजिक्स विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहिलं. क्वांटम फिजिक्स, क्वांटम कॉस्मोलॉजी, गुरुत्वाकर्षण या विषयांमध्ये त्यांनी संशोधन केलं आहे.

१९९९पासून पृथ्वीभोवतालच्या वातावरणात अतिउंचीवर (४१ हजार मीटर्स) ‘सूक्ष्मजीवांचे अस्तित्व’ या विषयावर एका आंतरराष्ट्रीय समूहासह त्यांचं काम सुरू असून, त्यांना त्या उंचीवर काही सूक्ष्म पेशी आणि जीवाणूंचं अस्तित्व असल्याचे  धक्कादायक शोध लागले आहेत.

जयंत नारळीकर हे अत्यंत वाचकप्रिय लेखक असून, ‘चार नगरातले माझे विश्व’, ‘आकाशाशी जडले नाते’, ‘खगोलशास्त्राचे विश्व’, ‘टाइम मशीनची किमया’, ‘यक्षांची देणगी’, ‘वामन परत न आला’, ‘प्रेषित’ ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. ‘चार नगरातले माझे विश्व’ या त्यांच्या आत्मचरित्राला साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search