Next
नाथगीता (अध्याय १ ते १८)
BOI
Tuesday, March 19, 2019 | 10:29 AM
15 0 0
Share this article:

श्रीमद्भगवद्गीता हा भारतीयांचा महत्त्वाचा ग्रंथ समजला जातो. तिच्या वाचनातून अंतिम सत्याचे दर्शन घडण्यास मदत होते. व्यवहार व परमार्थ एकत्र साधला जातो. यामुळे आध्यात्मिक गोंधळ बाजूला सारता येतो आदी मुद्दे स्पष्ट करीत त्यांचे विवेचन व गीतेचे हे वेगळेपण डॉ. वृषाली पटवर्धन यांनी ‘नाथगीता’मधून दाखवून दिले आहे. जीवाला त्याचे अंतिम उद्दिष्ट गाठण्यासाठी गीता मदत करू शकते, असे यात म्हटले आहे.

पंचेद्रिये (पांडव), शेकडो आसक्ती (कौरव), अनियंत्रित विचार (दोन्ही बाजूचे सैन्य), संभ्रमित मन (अर्जुन) व आत्मज्ञान, अशी रचना देहाची असते. त्यांच्या सततच्या महायुद्धातून विवेकाने विजय मिळवीत परमप्रकाशात विलीन होण्याची क्रिया म्हणजे गीता, या अर्थाने या पुस्तकात महाभारताची प्रतीकात्मक कथा असून, हे रूपक उलगडून दाखविले आहे. दशानन, मोक्ष, संन्यास, यज्ञ यांसारख्या अनेक संकल्पना लेखिकेने समजावून सांगितल्या आहेत. चुकीच्या पारंपारिक मतांचे खंडन करीत योग्य विचार करण्याची दिशा यातून दाखविली आहे.

पुस्तक : नाथगीता (अध्याय १ ते १८)
लेखक : डॉ. वृषाली पटवर्धन
प्रकाशक : आरंभ प्रकाशन
पाने : ६१०
किंमत : ५०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search