Next
पंढरपूर येथे बुद्धिमान विद्यार्थी उन्हाळी वर्ग
BOI
Monday, May 28, 2018 | 11:22 AM
15 0 0
Share this article:सोलापूर : ‘रयत शिक्षण संस्थेच्या शाळांमध्ये शिकलेला विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी यावर्षी प्रथमच बुद्धिमान विद्यार्थी उन्हाळी वर्ग सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम पंढरपूर येथील यशवंत विद्यालयात सुरू करण्यात आला असून, यामध्ये सुमारे ११५ विद्यार्थी सहभागी झाले आहेत,’ अशी माहिती प्रकल्प प्रमुख पांडुरंग सोलनकर यांनी दिली.

दरवर्षी हा उन्हाळी वर्ग सातारा येथे भरवण्यात येतो; मात्र सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची जिल्ह्यातच चांगल्या ठिकाणी सोय व्हावी म्हणून संस्थेच्या मध्यविभाग सल्लागार समितीचे अध्यक्ष संजीव पाटील यांच्या विषेश प्रयत्नातून यंदा प्रथमच हा उन्हाळी वर्ग पंढरपुरात सुरू करण्यात आल्याचे सोलनकर यांनी सांगितले.

हा विषेश उन्हाळी वर्ग इयत्ता आठवी व नववीमध्ये ९० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांसाठी घेण्यात आला आहे. हा वर्ग निवासी असून, यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत चहा, नाष्टा, भोजन व निवासाची स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. या वर्गासाठी ‘रयत’च्या रोपळे (ता. पंढरपूर) येथील पाटील विद्यालयातील दोन विद्यार्थी, भोसे शाळेतील बारा, भाळवणी शाळेतील आठ, पुळूज शाळेतील चार, पिलीव शाळेतील सहा, घोटी शाळेतील तीन, फळवणी शाळेतील दहा, वरवडे शाळेतील दोन, अकोला-वासूद शाळेतील तेवीस, वांगी क्रमांक एक शाळेतील दोन, बोरगाव शाळेतील सतरा, मरवडे शाळेतील पाच, चिखलठाण शाळेतील सात, महुद शाळेतील दोन, रिधोरे शाळेतील एक, मांजरी शाळेतील सात, शिंदेवाडी शाळेतील दोन अशा एकूण ११५ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. यामध्ये ७८ मुली व ३७ मुलांचा समावेश आहे.

‘रयत’च्या अकोला-वासूद, बोरगाव व भोसे या तीन शाळेत ९० टक्क्यांच्या वर गुण मिळवलेले दहापेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. त्यामुळे या शाळेतील शिक्षक कर्मचारी व विद्यार्थांचे रयत शिक्षण संस्थेत विषेश कौतुक होत आहे. या वर्गाला १४ मेपासून सुरुवात झाली असून, ते पाच जूनपर्यंत चालू राहणार आहेत. या काळात विद्यार्थ्यांना ‘रयत’च्या जनरल बॉडीचे सदस्य डॉ. राजेंद्र जाधव व डॉ. मीना जाधव हे मोफत वैद्यकीय सुविधा देत आहेत.

हा वर्ग यशस्वी करण्यासाठी प्रकल्प प्रमुख सोलनकर, पंढरपूर कॉलेजचे प्राचार्य सीताराम गोसावी, केंद्र प्रमुख एम. के. निकम, वरिष्ठ लेखनिक शामराव बागल, के. व्ही. रेडे, एस. डी. लेंडवे, एस. जी. जरे, एल. डी. काळे, एस. के. जाधव हे प्रयत्न करीत आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search