Next
‘श्री साईबाबा संस्‍थान’तर्फे शिर्डी महोत्सवाचे आयोजन
प्रेस रिलीज
Saturday, December 22, 2018 | 10:34 AM
15 0 0
Share this article:

शिर्डी : ‘श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था यांच्या वतीने नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागत यानिमित्त शिर्डी महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले आहे. श्री साईबाबांच्‍या दर्शनासाठी शिर्डीत होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेऊन समाधी मंदिर ३१ डिसेंबर २०१८ रोजी दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्‍यात येणार आहे,’ अशी माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली.

त्या म्‍हणाल्‍या, ‘दरवर्षी नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्‍वागतानिमित्त श्रींच्‍या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. येणाऱ्या सर्व भाविकांना श्रींच्‍या समाधीच्‍या दर्शनाचा लाभ मिळावा व होणाऱ्या गर्दीचे नियोजन योग्‍यरितीने व्‍हावे या उद्देशाने ३१ डिसेंबरला श्रींचे समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे ३१ डिसेंबरची शेजारती व एक जानेवारी २०१९ची पहाटेची काकड आरती होणार नाही.’

या निमित्ताने २२ ते ३१ डिसेंबर या कालावधीत विविध सां‍स्‍कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे. यामध्‍ये २२ डिसेंबरला सायंकाळी ७.३०  ते रात्री नऊ या वेळेत बेंगलोर येथील द्वारका मंडळींचा साईभजन संध्‍या कार्यक्रम होईल. २३ डिसेंबरला सायंकाळी सात ते ८.३० या वेळेत दिल्ली येथील मनिषा धिंग्रा व रात्री ८.३० ते ९.४५ या वेळेत मुंबईतील रमेश ओबेरॉय यांचा कार्यक्रम होईल. २४ डिसेंबरला सायंकाळी सात ते ९.४५ या वेळेत सुबरत, ओडीसा, २५ डिसेंबरला सायंकाळी सात ते ९.४५ या वेळेत नाशिकच्या विनया कुलकर्णी यांचा, २६ डिसेंबरला सायंकाळी सात ते ९.४५ या वेळेत कर्नाटक येथील अनिलकुमार मिस्किन यांचा, २७ डिसेंबरला सायंकाळी सात ते ९.४५ या वेळेत शिर्डीतील सुधांशू लोकेगांवकर यांचा कार्यक्रम होईल. २८ डिसेंबरला सायंकाळी सात ते ९.४५ या वेळेत येवलातील श्रृती कंकण, २९ डिसेंबरला सायंकाळी सात ते ९.४५ या वेळेत शिर्डी येथील रवींद्र पिंगळे, ३० डिसेंबरला सायंकाळी सात ते ९.४५ या वेळेत मुंबईतील नारायण मुंदडा व सार्थक (आप्‍पा) गायकवाड आणि ३१ डिसेंबरला सायंकाळी सात ते ९.३० या वेळेत मुंबईतील जगदीश मारुती पाटील व रात्री ९.३० ते ११.४५ या वेळेत नागपुरातील साई स्‍वरांजली संगीत संच यातील कलाकारांचे साईभजन संध्‍या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

‘नाताळ व नवर्षाच्‍या सुट्टीच्‍या गर्दीमुळे २५ डिसेंबर, ३१ डिसेंबर व एक जानेवारी २०१९ रोजी असे तीन दिवस श्री साईसत्‍यव्रत पूजा, अभिषेक पूजा बंद राहील याबरोबरच ३१ डिसेंबर व एक जानेवारी असे दोन दिवस वाहन पूजा बंद राहतील,’ असे आवाहन अग्रवाल यांनी केले आहे.

हा महोत्‍सव यशस्‍वीरित्‍या पार पाडण्‍यासाठी संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ. सुरेश हावरे, उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्‍य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल व सर्व विश्‍वस्‍तांच्‍या मार्गदर्शनाखाली संस्‍थानचे उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे पाटील, उपकार्यकारी अधिकारी बाबासाहेब घोरपडे, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभागांचे विभाग प्रमुख व सर्व कर्मचारी प्रयत्‍नशील आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search