Next
हिमायतनगरमध्ये शौर्य प्रशिक्षण शिबिर सप्ताह
नागेश शिंदे
Monday, May 06, 2019 | 01:03 PM
15 0 0
Share this article:

हिमायतनगर : सेवा, सुरक्षा आणि संस्कार या त्रिसूत्रीवर काम करणारे बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने हिमायतनगर शहरात सात ते १४ मे २०१९ या कालावधीत शौर्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर बोरगडी रोड येथील बालाजी विद्यालयाजवळ सकाळी पाच ते सायंकाळी सहा या वेळेत होईल. 

बजरंग दलाच्या माध्यमातून युवक देशभर कार्यरत आहेत. या कार्यात युवकांचा सहभाग वाढवा आणि त्यातून सशक्त पिढी निर्माण व्हावी यासाठी हे शिबिर घेण्यात येणार आहे. बजरंग दलाच्या माध्यमातून अयोध्या, गोवंश रक्षा, धर्मांतरविरोधी यांसह अनेक आंदोलने करण्यात आली आहेत. या वर्षी हे प्रशिक्षण शिबिर मोठ्या स्वरूपात घेण्यात येणार आहे. यामध्ये दंडयुक्त (लाठी-काठी), रायफल, नियुद्ध, समता, साहसी, खेळ अशा शारीरिक विषयांचा, तसेच हिंदू समाजातील विविध अनुक्रमे, सामाजिक समरसता, आदर्श कार्यकर्त्ता, शिवरायांची युद्ध नीती, गोरक्षा अशा विविध विषयांवर मार्गदर्शन व चर्चा, वक्तृत्व कला, पथनाट्य, आंदोलने, कथाकथन, व्यक्तिमत्त्व विकास आदी विषयांचा समावेश असेल. 

प्रांत मंत्री अनंत पांडे, प्रांत संयोजक शिवप्रसाद कोरे, प्रांत सहसंयोजक चंद्रकांत घोलप आदींसह अनेक मार्गदर्शकांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर होईल. जास्तीत जास्त नव युवकांनी या शिबिरात सहभागी व्हावे. या शिबिरात येणाऱ्यांना विविध नियम, अटी लागू असून, त्यांचे पालन करणे अनिवार्य असल्याचे हिमायतनगर बजरंग दल तालुकाअध्यक्ष गजानन चायल व किरण बिच्चेवार यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search