Next
फोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान
पुण्याच्या ध्रुव फडकेचा अभिनव उपक्रम
BOI
Monday, December 10, 2018 | 12:53 PM
15 0 0
Share this article:


पुणे : हौसेला मोल नसते, असे म्हणतात; पण या हौसेला सामाजिक जाणीवेचे भान दिले, तर त्याला एक वेगळेच महत्त्व प्राप्त होते. पुण्यातील ध्रुव फडके याने हौसेखातर जोपासलेल्या फोटोग्राफीच्या छंदाला सामाजिक जबाबदारीची जोड दिली आहे. त्याने त्याच्या फोटोंचे प्रदर्शन भरवले असून, त्यातून मिळणारे उत्पन्न रत्नागिरीतील त्याला ‘सहयाद्री निसर्ग मित्र’ या संस्थेला देण्याचा निर्णय घेतला आहे.  


सेनापती बापट रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयाच्या प्रदर्शन दालनामध्ये त्याने काढलेल्या विविध प्राणी, पक्षी, निसर्गाची रमणीय रूपे दर्शविणाऱ्या फोटोंचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. अकरा डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. 


ध्रुव फडके याने नुकतेच आर्किटेक्चरचे शिक्षण पूर्ण केले असून, आई, वडिलांच्या पाठिंब्यामुळे त्याने फोटोग्राफीचा छंद जोपासला. निसर्गाचे फोटो काढायला त्याला अधिक आवडत असल्याने त्याने अनेक फोटो काढले आहेत. 

ध्रुव फडके
याचदरम्यान रत्नागिरीतील कासव संवर्धनासाठी काम करणाऱ्या ‘सह्याद्री मित्र संस्थे’च्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्या कार्याला मदत करण्याचा विचार करत असताना, त्याला या प्रदर्शनाची कल्पना सुचली. या अभिनव उपक्रमामुळे त्याने तरुणाईसमोर एक आदर्श निर्माण केला असून, लोकांकडून त्याचे कौतुक होत आहे.  


कार्यक्रमाविषयी 
ध्रुव फडके यांच्या निसर्ग फोटोंचे प्रदर्शन 
स्थळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, सेनापती बापट मार्ग 
दिवस : मंगळवार, अकरा डिसेंबर २०१८

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
'S B Iyer About 283 Days ago
Congratulations Dhruv !! Proud of you...very nice exibition and nice idea to help to Turtle conservation.
0
0
Khyati Sheth About 284 Days ago
Amazing photography! Enjoyed seeing all with story behind each picture. Great work! Keep it up!👍
0
0
Ketan About 284 Days ago
Very Detailed and Articulate Photography, Great eye for Detailing...Very Just Cause to Support..Keep it up
0
0
Shashank Phadke About 284 Days ago
Good conceptual photography. Amazing picture
0
0
Manisha Phadke About 284 Days ago
Very proud of you. Great work great cause.
0
0
Renu Anand About 284 Days ago
Amazing photographs. And a very Noble cause .All the best.
0
0

Select Language
Share Link
 
Search