Next
‘चैतन्य होमिओ हार्टकेअर’तर्फे ‘हृदय चैतन्य २०१८’चे आयोजन
प्रेस रिलीज
Thursday, September 27, 2018 | 04:11 PM
15 0 0
Share this article:

‘हृदय चैतन्य २०१८’ची माहिती देताना चैतन्य होमिओ हार्टकेअर क्लिनिक अ‍ॅंड रिसर्च सेंटरचे संस्थापक व होमिओपॅथी हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विद्यासागर उमाळकर. शेजारी होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. अश्विनी उमाळकर-गुगले.पुणे : येथील चैतन्य होमिओ हार्टकेअर क्लिनिक अ‍ॅंड रिसर्च सेंटरतर्फे जागतिक हृदयदिनानिमित्त २९ सप्टेंबर २०१८रोजी एस. एम. जोशी हॉल येथे सकाळी १० वाजता ‘हृदय चैतन्य २०१८’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रसिद्ध शास्त्रज्ञ व नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

चैतन्य होमिओ हार्टकेअर क्लिनिक अ‍ॅंड रिसर्च सेंटरचे संस्थापक व होमिओपॅथी हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विद्यासागर उमाळकर आणि होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. अश्विनी उमाळकर-गुगले यांनी याबाबतची माहिती दिली. या प्रसंगी नाशिक आरोग्य विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. अरुण जामकर, वरिष्ठ होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. पी. एस. कृष्णमूर्ती, सीसीएच दिल्लीचे माजी उपाध्यक्ष डॉ. अरुण भस्मे, मिटसॉटचे प्रकल्प संचालक डॉ. मिलिंद पांडे, वरिष्ठ पत्रकार संदीप आचार्य हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

डॉ. उमाळकर म्हणाले, ‘चैतन्य होमिओ हार्टकेअर क्लिनिक अ‍ॅंड रिसर्च सेंटर गेल्या ३३ वर्षांपासून होमिओपॅथीद्वारे हृदयविकारांवर यशस्वी उपचार करत आहे. हृदयविकार हे आपल्या देशांत मृत्युचे प्रमुख कारण बनत चालले असून, हे थांबविणे गरजेचे आहे. या कार्यक्रमाद्वारे हृदयविकारांच्या उपचारामध्ये होमिओपॅथीची भूमिका याबाबत आम्ही जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहोत.’

डॉ. गुगले म्हणाल्या, ‘हृदयचैतन्य हा आम्हाला एक वार्षिक कार्यक्रम म्हणून प्रस्थापित करण्याचे आमचे ध्येय असून, याद्वारे निरोगी हृदयासाठी समग्र आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करायचे आहे. या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुण्यांचे मनोगत तसेच आम्ही उपचार केलेल्या काही रुग्णांचा अनुभव लोकांसमोर मांडला जाणार आहे.’

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सूत्रसंचालक राजेश दामले हे डॉ. उमाळकर यांची ‘हृदयविकार आणि होमिओपॅथी उपचार’ यावर प्रकट मुलाखत घेतील.

कार्यक्रमाविषयी :
दिवस : शनिवार, २९ सप्टेंबर २०१८
वेळ : सकाळी १० वाजता
स्थळ : एस. एम. जोशी हॉल, पुणे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search