Next
‘माणसातील ईश्वरावर प्रेम करा’
'टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्टियम'तर्फे पुरस्कार प्रदान
प्रेस रिलीज
Monday, October 29, 2018 | 05:16 PM
15 0 0
Share this article:पुणे : ‘प्रत्येक माणसाच्या आत परमेश्वर दडलेला असतो. या परमेश्वराला ओळखून त्याची सेवा आपण केली पाहिजे. चांगल्या गोष्टींचा ध्यास घेऊन त्या मिळवण्याचा आणि त्याचा समाजाला उपयोग होईल, याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा,’ असे मत त्रिपुरा व बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केले.

टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्टियमतर्फे (टीएमसी) उल्लेखनीय कामगिरीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांना डॉ. पाटील यांच्या हस्ते ‘अॅवॉर्ड ऑफ एक्सलन्स’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. हा सोहळा विमाननगर येथील हॉटेल नोवाटेलमध्ये पार पडला. या वेळी ‘टीएमसी’चे अध्यक्ष बाहरी बी. आर. मल्होत्रा, सल्लागार मंडळाचे चेअरमन डॉ. शां. ब. मुजुमदार, वरिष्ठ उपाध्यक्ष मुकेश मल्होत्रा, आश्वनी मल्होत्रा, कर्नल के. सी. मिश्रा, नीलकंठ ज्वेलर्सचे दिलबाग सिंग, उद्योजक सुदर्शन बन्सल, महासचिव डॉ. जयसिंग पाटील आदी उपस्थित होते.यामध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप (प्रशासकीय सेवा), ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले व हँड सर्जन डॉ. पंकज जिंदल (आरोग्यसेवा), दी लीला ग्रुपचे मोहित अगरवाल व नोवाटेल हॉटेलचे नितीन पाठक (उद्योग), संजीवनी मुजुमदार (शिक्षण), विजय मित्तल (समाजसेवा), डॉ. शैलेश पालेकर (रोटरी सेवा), अभिनेत्री गिरीजा ओक (अभिनय) आणि साहिब दिलबाग सिंग (सराफा व्यवसाय) यांना या प्रसंगी गौरविण्यात आले. जानकी मल्होत्रा आणि नीलम पाटील यांचा विशेष सत्कार या वेळी करण्यात आला.

डॉ. डी. वाय. पाटील म्हणाले, ‘सुरुवातीपासूनच शिक्षण, समाजकारण क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती. ध्यास घेऊन ती करत गेल्याने प्रत्यक्षात आली. वसंतदादा पाटील, शरद पवार, प्रतिभाताई पाटील यांच्या सहकार्याने राजकारणात आलो. राज्यपाल झालो, ही सगळी पुण्याई पाठिशी असल्याने आणि माणसातील परमेश्वरावर प्रेम केल्याने शक्य झाले.’डॉ. मुजुमदार यांच्यासह सत्कारार्थींनी या वेळी मनोगत व्यक्त केले. बाहरी बी. आर. मल्होत्रा यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. डॉ. जयसिंग पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अश्विनी मल्होत्रा यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search