Next
‘सर्व्ह सेफ फूड’ उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
प्रेस रिलीज
Wednesday, March 28, 2018 | 02:45 PM
15 0 0
Share this story

‘सर्व्ह सेफ फूड’ उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी सार्वजनिक अन्न वितरण मंत्री गिरीश बापट, एफडीएच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, डॉ. स्वाती पिरामल, अरबिंद सिंग़ आदी मान्यवर उपस्थित होते.

मुंबई : महाराष्ट्र अन्न व औषध मंडळ (एफडीए)व नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट वेंडर्स ऑफ इंडिया (एनएएसव्हीआय)शी भागीदारी करून नेस्ले इंडिया कंपनीने ‘सर्व्ह सेफ फूड’ हा प्रकल्प आयोजित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. या प्रकल्पाअंतर्गत, आरोग्य, स्वच्छता, सुरक्षितअन्न, टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट, व्यावसायिकता या महत्त्वाच्या आणि गंभीर विषयांवर रस्त्यांवर अन्नपदार्थ विकणाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी राज्यभर मोबाइल व्हॅन फिरणार आहे. अन्नसुरक्षेसह राज्यभरातील रस्त्यांवर अन्न पदार्थ विकणाऱ्यांचे जीवनमान सुधारणे, हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये राष्ट्रीय पातळीवर सुरू झालेल्या या प्रकल्पांतर्गत यापूर्वी भारतातील पाच हजारहून अधिक विक्रेत्यांना फायदा झाला असून महाराष्ट्रातल्या तीन हजार ६००विक्रेत्यांनी या प्रकल्पाचा लाभ  घेतला आहे.
 
या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस़ म्हणाले, ‘रस्त्यावर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांसाठी आपले राज्य प्रसिद्ध असून अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत या पथविक्रेत्यांना आपण जागरुक करू शकलो, तर त्यांचे भवितव्य उज्ज्वल असेल. ग्राहकांना आरोग्यपूर्ण अन्न मिळण्यासाठीच हा उपक्रम महत्वाचा नसून, पथविक्रेत्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीही हा प्रकल्प अत्यंत फलदायी ठरणार आहे.’

 एफडीएच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे म्हणाल्या, ‘आजच्या वातावरणात अन्न सुरक्षा आणि स्वच्छता हे खासकरून पथविक्रेत्यांसाठी महत्वाची भूमिका निभावतात, ज्यासाठी प्रशिक्षण हे सर्वाधिक महत्वाचे आहे. महाराष्ट्र एफडीए आणि नेस्ले इंडियाचे हे उपक्रम महत्त्वाचे ठरतात.’
 
नेस्ले इंडियाच्या संचालक मंडळाच्या संचालिका आणि पिरामल एंटरप्राइजेस लिमिटेडच्या उपाध्यक्ष डॉ. स्वाती पिरामल म्हणाल्या, ‘रोजगारातील वृद्धी आणि सुरक्षित अन्नाची खातरजमा हे मुद्दे नेस्ले इंडियाच्या सामाजिक उपक्रमांच्या केंद्रस्थानी आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रमातून रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना स्वच्छ आणि आरोग्यदायी पदार्थ देणे शक्य होणार आहे. विक्रेत्यांच्या रोजगारात सुधारणा करणे आणि लोकांना दिले जाणारे पदार्थ आरोग्यदायी आणि सुरक्षित आहेत याची खातरजमा करण्यात हा उपक्रम दिर्घकाळ भूमिका बजावणार आहे.’

एनएएसव्हीआयचे राष्ट्रीय समन्वयक अरबिंद सिंग़ म्हणाले, ‘महाराष्ट्रात रस्त्यांवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांची संख्या मोठी असून त्यांचे उत्पन्न वाढवण्यात व आरोग्यपूर्ण राज्य उभे करण्यात या प्रशिक्षण उपक्रमामुळे फायदा होणार आहे. पथविक्रेत्यांचे आयुष्य सुधारण्यासाठी आखण्यात आलेल्या या प्रकल्पाचे अपडेट्स एनएएसव्हीआयतर्फे स्ट्रीटसाथी अॅपच्या माध्यमातूनही सादर केले जाणार आहेत.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link