Next
औरंगजेब : कुळकथा
BOI
Tuesday, December 04, 2018 | 09:49 AM
15 0 0
Share this story

शिवाजी महाराजांचा इतिहास हा औरंगजेबाशिवाय पूर्ण होत नाही. भारतीय इतिहासातही शिवाजी महाराजांचे नाव प्रकर्षाने नोंदलेले दिसते. औरंगजेबाच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध प्रथम हमीदुद्दिन खान याच्या ‘अहकामे आलमगिरी’ या मूळ पर्शियन ग्रंथातून घेतला गेला. त्याचा इंग्रजी अनुवाद डॉ. जे. एन. सरकार यांनी केला. पुढे डॉ. भगवान गणेश कुंटे यांनी ‘औरंगजेबाच्या कुळकथा’ या नावाने त्याचा कथानुवाद केला. याचे संपादन प्रा. अ. रा. कदम यांनी ‘औरंगजेब : कुळकथा’मधून केले आहे.

तरुण औरंगजेबाची माहिती देताना हत्तीशी लढत, भाऊ दाराशुकोहबद्दल लढाया रंगात येण्यापूर्वी त्याने घेतलेली दक्षता यातून पराक्रमी, धडाडी, हिम्मत धूर्तपणा, कावेबाजपणा व वडिलांच्या प्रेमाला पारखा झालेला तरुण औरंगजेबाचे दर्शन होते. यातच दक्षिण प्रांतात शिवरायांशी झालेल्या लढ्याचा, मृत्युपत्र व मृत्युलेखाचा उल्लेख आहे. औरंगजेबाचे पुत्र व नातू, त्यांच्याविषयी औरंगजेबची भावना, त्यांना केलेला उपदेश, अधिकाऱ्यांशी त्याचे वर्तन, शियापंथीय लोक व हिंदूंविषयीची धोरणे यातून समजतात.          

प्रकाशक : राजमयूर प्रकाशन
पाने : १६०
किंमत : १७० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link