Next
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा
प्रेस रिलीज
Friday, July 12, 2019 | 03:49 PM
15 0 0
Share this article:


औंध : रयत शिक्षण संस्था संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम डॉ. आंबेडकर महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग आणि कुटुंब नियोजन कल्याण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे प्रमुख डॉ. धनंजय लोखंडे यांनी भूषविले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य डॉ. मुकुंद महाजन, डॉ. प्रवीण सोनावणे, निशिकांत श्रोत्री, ‘तुला पाहते रे’मधील ईशा म्हणजेच अभिनेत्री गायत्री दातार उपस्थित होत्या. 


या वेळी बोलताना माजी प्राचार्य डॉ. महाजन म्हणाले, ‘समाजाचे प्रबोधन करण्याच्या निमित्ताने हा दिवस साजरा केला जात आहे. जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यामागचा खरा उद्देश समाजाचा विकास करणे हा आहे. लोकसंख्या नियंत्रित झाल्यास कुटुंबाचा आणि पर्यायाने समाजाचा विकास होईल.’ 

डॉ. सोनावणे म्हणाले, ‘लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी समाजात प्रचार आणि प्रसार करावा लागेल. लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी शासनाने कुटुंबकल्याण योजनेचा वापर केलेला दिसतो. मातामृत्यू प्रमाण कमी व्हावे म्हणून शासनाने १९७२ साली गर्भपात कायदा केला. गर्भपातामुळे प्रतिवर्षी १८ टक्के स्त्रिया मृत्युमुखी पडतात. त्यामुळे नंतर ‘कुटुंब नियोजित पालकत्व’ ही संकल्पना आली. आजच्या तरुणांनी या संकल्पनेचा वापर केला तर आनंदी कुटुंबाची आणि समाजाची निर्मिती होईल.’

कार्यक्रमाध्यक्ष डॉ. लोखंडे म्हणाले, ‘कुटुंब नियोजनाबरोबर आपले आरोग्य जपले पाहिजे. मुलांना योग्य जोडीदाराची निवड करता आली पाहिजे. नव्या पिढीने कुटुंब नियोजन करावे. आपल्या मुलांना चांगले आरोग्य, चांगले शिक्षण मिळावे म्हणून कुटुंब नियोजन करावे. त्यामुळे कुटुंबाचा आणि पर्यायाने समाजाचा विकास होईल.’ 


अभिनेत्री गायत्री दातार म्हणाल्या, ‘आपला जोडीदार कसा असावा, आपल्या कुटुंबात किती मुले असावीत, याचे योग्य नियोजन करावे. कारण आपल्यापेक्षा आपली मुले हुशार असणार आहेत. आपल्या मुलांना चांगले आणि आनंदी जीवन जगता यावे म्हणून कुटुंब नियोजन महत्त्वाचे आहे.’

या वेळी सर्व विद्यार्थ्यांना लोकसंख्या नियंत्रणाची प्रतिज्ञा देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख इंग्रजी विभागप्रमुख डॉ. सविता पाटील यांनी करून दिली. मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. तानाजी हातेकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. सायली गोसावी यांनी केले. या वेळी प्रा. भीमराव पाटील, प्रा. मयुर माळी, प्रा. किरण कुंभार, डॉ. सविता पाटील, डॉ. अतुल चौरे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 67 Days ago
Such events aught to be organized often and ,so thst they wil be more effective in the long run , in educational institutions . Earth has finite resources . They are certain to be used up . How much population can they support ?
0
0

Select Language
Share Link
 
Search