Next
नगर महापालिकेच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात
अहिल्यादेवी होळकर चौकात रावसाहेव पाटील-दानवे घेणार जाहीर सभा
प्रेस रिलीज
Saturday, November 24, 2018 | 04:35 PM
15 0 0
Share this article:

अहमदनगर : महापालिकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या सर्व उमेदवारांची यादी जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली आहे. ‘भाजप’चे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे २५ नोव्हेंबर २०१८ पासून निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहेत. रविवारी सायंकाळी ते एक जाहीर सभा घेणार आहेत.

नगर महापालिकेत पहिल्यांदाच स्वबळावर लढणाऱ्या ‘भाजप’च्या प्रचारासाठी मोठ्या नेत्यांच्या जाहीर सभांचे नियोजन केले आहे. रविवारी प्रदेशाध्यक्ष दानवे नगर शहराच्या दौऱ्यावर येत आहेत. सायंकाळी चार वाजता त्यांचे पोलीस परेड मैदान येथे हेलिकॉप्टरने आगमन होणार असून, तेथून ते माळीवाडा येथील विशाल गणपती मंदिरात जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेणार आहेत. येथूनच ‘भाजप’च्या प्रचाराचा सुरुवात होणार असून, गणेश मंदिरापासून मोटारसायकलवर स्वार होऊन ते रॅलीद्वारे अहिल्यादेवी होळकर चौकात प्रस्थान करणार आहेत. या रॅलीदरम्यान ते संपूर्ण शहरात फिरणार आहेत. या वेळी त्यांच्यासह खासदार दिलीप गांधी यांच्यासह ‘भाजप’चे सर्व स्थानिक प्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.

त्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास अहिल्यादेवी होळकर चौकातच भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून, दानवे या सभेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर रात्री ते स्थानिक नेते, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search