Next
‘ईक्लर्क्स-नॅसकॉम’तर्फे कौशल्य प्रशिक्षण
प्रेस रिलीज
Thursday, May 10 | 10:47 AM
15 0 0
Share this story

पुणे : क्रिटीकल बिझनेस ऑपरेशन्स सर्व्हिसेस पुरवठादार कंपनी असलेल्या ईक्लर्क्स आणि नॅसकॉम फाउंडेशनतर्फे ४८०हून अधिक अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना ई-स्कील्स एम्प्लॉयबिलिटी एन्हान्समेंट कार्यक्रमांतर्गत  प्रशिक्षण देण्यात आले.

ई-स्कील्स एम्प्लॉयबिलिटी एन्हान्समेंट कार्यक्रम हा (सीएसआर) व्यावसायिक सामाजिक जबाबदारी अंतर्गत सुरू करण्यात आलेला ई-क्लर्क्सचा कार्यक्रम आहे. याची संकल्पना नॅसकॉम फाउंडेशनची असून, याचे संचालन देखील नॅसकॉम फाउंडेशन करत आहे. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीशी संलग्नता असलेले एनालिटिक्स आणि सीआरएम (नॉन व्हॉइस) अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण ऑन कँपस दृष्टिकोनाच्या माध्यमातून सहा महाविद्यालयांमध्ये दिले जात आहे. या कार्यक्रमासाठी ५३०हून अधिक विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती ज्यामध्ये ६४टक्के सहभाग मुलींचा होता. एकूण विद्यार्थ्यांपैकी ४८० विद्यार्थी अंतिम नॅसकॉम सेक्टर स्किल्स कौन्सिल्स प्रमाणन परिक्षा उत्तीर्ण झाले. भारतातील व्यावसायिक प्रशिक्षण देणारी आघाडीची संस्था माईंड मॅप कन्सल्टिंगद्वारे हे प्रशिक्षण प्रदान करण्यात आले.

सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुण्याचे डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, मुंबईचे सोमय्या कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स आणि दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, चंदीगडचे एमसीएम डीएव्ही कॉलेज फॉर वुमेन या महाविद्यालयांना या उपक्रमाचा लाभ झाला.

पदवीदान समारंभावेळी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना ईक्लर्क्स सर्व्हिसेस लिमिटेडचे सहसंस्थापक आणि कार्यकारी संचालक पी. डी. मुंध्रा म्हणाले, ‘पदवीदान समारंभ हा महत्त्वाकांक्षी युवकांना त्यांचे करिअरचे साध्य करण्यासाठी प्रेरित करणार्‍या कार्यक्रमाचा समारोप आहे. ई-स्कील्स एम्प्लॉयबिलिटी एन्हान्समेंट कार्यक्रमाच्या आमच्या पहिल्या बॅचमधील विद्यार्थ्यांना आधुनिक कौशल्यांनी सज्ज केल्याचा आम्हाला आनंद आहे आणि आशा आहे की आपल्या उद्योगामधील शाश्वत प्रतिभेचा स्रोत बनत असलेल्या उपेक्षित समुदायातील विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम लाभदायक ठरेल.’

नॅसकॉम फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत सिन्हा म्हणाले, ‘ईक्लर्क्सचे भागीदार असल्याचा आम्हाला आनंद आहे. या कार्यक्रमांतर्गत उपेक्षित समुदायातील विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या कौशल्यांचे प्रशिक्षण दिल्याने आणि त्यांना कोणत्याही आयटी-बीपीएम कंपनीसाठी रोजगारक्षम केल्याने याचा समाज आणि उद्योग दोघांनाही फायदा होईल. आमचे भागीदार ईक्लर्क्सच्या या उपक्रमाच्या माध्यमातून व्यावसायिक सामाजिक जबाबदारीच्या (सीएसआर) पैशांचा कसा वापर करावा व त्याद्वारे अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देता येतील याचे उदाहरण आहे.’

राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) यांनी तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार एका वर्गात प्रशिक्षकाच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या फ्रेमवर्कमध्ये हे प्रशिक्षण दिले गेले. या कार्यक्रमाने एसएससी नॅसकॉम क्वालिफिकेशन पॅक फॉर सीआरएम नॉन-व्हॉइस क्यूपी २०११ आणि असोसिएट अँनालिटिक्स क्यूपी २१०१यांसह लक्ष्य लाभार्थींना सज्ज केले आहे. तांत्रिक-ज्ञानासंबंधित अभ्यासक्रमाव्यतिरिक्त लाइफ स्कील्स (जीवन कौशल्ये), फंक्शनल इंग्लिश, तोंडी आणि लेखी संभाषण कौशल्ये, व्यवसाय शिष्टाचार, समस्या सोडवणे, वेळेचे व्यवस्थापन, ग्राहकाभिमुख करणे, मुलाखत कौशल्ये आणि इतर सॉफ्ट स्कील्सने हा उपक्रम लाभार्थींना प्रशिक्षित करतो ज्यामुळे विद्यार्थी आयटी-बीपीएम उद्योगात रोजगार शोधू शकतात.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link