Next
‘ट्रूबिल’ने गाठला १०० कोटींचा वार्षिक महसूल दर
प्रेस रिलीज
Tuesday, May 22 | 11:57 AM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘ट्रूबिल’ या पूर्व-मालकीच्या कार्सच्या खरेदी-विक्रीसाठी असलेल्या देशाच्या आघाडीच्या‍ व्यासपीठाने महिन्याला ९ कोटींच्या कॅशफ्लोची सुविधा देत १०० कोटींचा वार्षिक महसूल दर गाठला आहे. ‘ट्रूबिल’ तिन्ही शहरांमधील कार्यसंचालनाच्या माध्यमातून लाभ प्राप्त करण्याच्या टप्यावर पोहोचली आहे. मुंबईस्थित कंपनीच्या महसूल विकासाला ग्राहक-केंद्रित ऑफरिंग्जच्या सीरीजचा, तसेच मुख्यत: त्यांचे फुल-स्टॅक इन्हेन्टवरी मॉडेल ट्रूबिल डायरेक्ट, ट्रूबिल ऑक्शन्स, व ‘ट्रूबिल’ बाजारस्थळ यांचे साह्य लाभले आहे.

‘ट्रूबिल बाजारस्थळ’, ‘ट्रूबिल डायरेक्ट’, ‘ट्रूबिल ऑक्शन्स’ व ‘ट्रूबिल पोस्ट सेल्स’ या त्यांच्या चार क्षेत्रांच्या माध्यमातून ‘ट्रूबिल’ पूर्व-मालकीच्या ऑटोमोबाइल्सच्या खरेदी-विक्रीची पूर्णत: त्रासमुक्त सुविधा देते. कंपनी दर महिन्याला ८५० हून अधिक व्यवहारांसोबतच पाच हजारांहून अधिक क्युरेटेड व निरीक्षण केलेल्या कार लिस्टिंग्ज आणि एक हजार ५००हून अधिक युनिक पेड सबस्क्राईब्ड ग्राहकांना सेवा देते.

‘ट्रूबिल’चे सह-संस्थापक आणि विपणन प्रमुख शुभ बन्सल म्हणाले, ‘आम्ही कार्यसंचालनाच्या माध्यमातून लाभाच्या टप्प्यावर पोहोचल्याने मला खूप आनंद होत आहे. यामधून आमच्या ऑफरिंग्ज वाढवत कार्यसंचालनांना चालना देण्याचे आमचे प्रयत्न दिसून येतात. आम्ही पाच टक्क्यांच्या मार्केट शेअरसह विद्यमान तीन शहरांमधील आमची उपस्थिती वाढवण्यासोबतच नवीन शहरांमध्ये प्रवेश करण्यासाठी योजना आखत आहोत; तसेच आम्ही प्रत्यक्ष, ऑनलाइन ते ऑफलाइन सेवेच्या दृष्टिकोनासह युज्ड कार क्षेत्रामध्ये बदल घडवून आणण्यासाठी प्रबळ तंत्रज्ञान आधार विकसित करण्याचा प्रयत्न करत आहोत.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link