Next
‘सा’ व ‘नी’तर्फे संगीत महोत्सवाचे आयोजन
प्रेस रिलीज
Wednesday, October 24, 2018 | 04:13 PM
15 0 0
Share this article:

अनुप कुलथेपुणे : येथील ‘सा’ व ‘नी’ सूर संगीत व एनसीपीए यांच्या संयुक्त विद्यमाने २७ व २८ ऑक्टोबर २०१८ रोजी ‘भवितव्य’ या खास उदयोन्मुख कलाकारांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गरवारे महाविद्यालयातील सभागृहात सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार असून, तो सर्वांसाठी खुला आणि विनामूल्य असेल.

आशय कुलकर्णी‘उदयोन्मुख कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या कलेला रसिकांकडून दाद मिळावी या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘भवितव्य’मध्ये भारतातील अतिशय प्रतिभावान व तरुण कलाकारांना या कार्यक्रमात आपली कला पेश करण्याची संधी दिली गेली आहे,’ अशी माहिती ‘सा’ व ‘नी’ चे संस्थापक सुरेंद्र मोहिते यांनी दिली आहे.

कृतिका जंगीनमठया कार्यक्रमात २७ ऑक्टोबरला विजापूर येथील अंध बासरीवादक कृतिका जंगीनमठ बासरी वादन सादर करतील. कृतिका यांचे सुरवातीचे शिक्षण विजापूर येथील अंध विद्यालयात झाल्यानंतर आता त्या पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्याकडे शिकत आहे. त्यांना तबल्याची संगत चारुदत्त फडके करतील. त्यानंतर अनुप कुलथे यांचे व्हायोलिन वादन होणार आहे. पंडित अतुलकुमार उपाध्ये यांचे ते शिष्य आहेत. त्यांना निलेश रणदिवे हे तबलासंगत करतील.

प्रकृती वाहानेयानंतर इंदोरच्या संतूरवादक प्रकृती वाहाने यांचे वादन होईल. त्यांचे वडील व गुरु लोकेश वाहाने यांच्याकडे त्यांनी शिक्षण घेतले आहे. त्यांना रोहित मुजूमदार तबला संगत करतील. पहिल्या दिवसाचा शेवट पुण्याच्या मेहेर परळीकर यांच्या शास्त्रीय गायनाने होईल. मेहेर यांचे सुरुवातीचे शिक्षण पद्माकर थत्ते यांच्याकडे झाले आहे. गेली सात वर्षे ते पंडित अजय चक्रवर्ती यांच्याकडे कोलकता येथे शिक्षण घेत आहेत. त्याला नीलेश रणदिवे हे तबल्यावर, तर लीलाधर चक्रदेव हे हार्मोनियवर संगत करतील.

मेहेर परळीकर२८ ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजता कोलकता येथील सौम्यजीत पॉल यांचे सतारवादन होईल. त्याचे सुरुवातीचे शिक्षण त्यांचे वडील सत्यजित पॉल यांच्याकडे झाले. गेली अठरा वर्षे विश्वपूर घराण्याचे सतारवादक पंडित सौमित्र लाहिरी यांच्याकडे ते शिक्षण घेत आहेत. अजिंक्य जोशी त्यांना तबला साथ करतील.

सावनी धर्माधिकारीकोल्हापूरच्या सावनी धर्माधिकारी हीचे हार्मोनियम वादन हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असणार आहे. ती दहा वर्षांची असून, तंत्रकारी अंगाने किंवा लयकारी अंगाने हार्मोनियम वादन करते व तिचे शिक्षण तिचे वडील राजप्रसाद धर्माधिकारी यांच्याकडे चालू आहे. प्रख्यात तबलावादक पंडित केशवराव धर्माधिकारी यांची ती नात आहे. सौरभ सनदी तिला तबला साथ करतील.

सौम्यजीत पॉलत्यानंतर आशय कुलकर्णी यांचे तबला सोलो वादन होईल. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण कोल्हापूरमध्ये राजप्रसाद धर्माधिकारी यांच्याकडे झाले आहे. गेली बारा वर्षे ते तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्याकडे शिकत आहेत. अभिषेक शिणकरत्यांना नगमासंगत करतील. त्यानंतर विनय रामदासन यांचे शास्त्रीय गायन होईल. मेवाती घराण्याचे गायक रमेश नारायण यांच्याकडे त्यांचे सुरुवातीचे शिक्षण झाले आहे. सध्या ते पंडित रघुनंदन पणशीकरांकडे शिकत आहेत. सावनी तळवलकर या त्यांना तबलासाथ, तर अभिषेक शिणकर हार्मोनियम साथ करणार आहेत.

या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन मंगेश वाघमारे करतील.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search