Next
चौथा भारतीय महिला सेंद्रिय महोत्सव मुंबईत
प्रेस रिलीज
Friday, March 16 | 02:30 PM
15 0 0
Share this story

मुंबई : केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयातर्फे येत्या १६ ते २० मार्च दरम्यान मुंबईत जागतिक व्यापार केंद्रात ‘भारतीय महिला सेंद्रिय महोत्सव २०१८’ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात देशभरातील अन्नधान्य, सौर उत्पादन, वैयक्तिक वापरासाठी वस्तू, गृह सजावट आदी विविध सेंद्रिय उत्पादने प्रदर्शित करण्यात येतील. 

भारतातल्या, सेंद्रिय शेती आणि इतर उत्पादक महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. देशभरातल्या दुर्गम भागातल्या महिलांना मुंबईत विनामूल्य वास्तव्य करून आपली उत्पादने प्रदर्शित करता येणार आहेत.लेह ते कन्याकुमारी, तसेच कोहिमा ते कच्छमधील ५०० हून अधिक महिला उद्योजिका या प्रदर्शनात आपली उत्पादने मांडणार आहेत.

सेंद्रिय अन्नपदार्थात अधिक जीवनसत्त्व आणि पोषण मूल्य आहेत;तसेच सेंद्रिय शेतीमुळे लागवडीचा खर्च २० ते ४० रुपये कमी होतो. मुलांसाठी आरोग्यदायी अन्न उपलब्ध होते; तसंच शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढते असे केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री मनेका गांधी यांनी म्हटले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link