Next
पुण्यात साने गुरुजी तरुण मंडळातर्फे राम मंदिराची ६० फूट उंच प्रतिकृती
गणपतीबाप्पासाठी सजावट
BOI
Tuesday, September 03, 2019 | 03:34 PM
15 0 0
Share this article:पुणे :
पुण्यातील साने गुरुजीनगरमधील साने गुरुजी तरुण मंडळाने यंदा गणेशोत्सवात अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. ही प्रतिकृती १०० फूट लांब, ४० फूट रुंद आणि ६० फूट उंच आहे. दोन सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजता ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या हस्ते मंडळाच्या गणपतीबाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तसेच, हैदराबाद रामनवमी उत्सवाचे जनक आमदार टायगर राजासिंह ठाकूर उर्फ राजाभैया यांच्या हस्ते श्रीराम मंदिर देखाव्याचे उद्घाटन करण्यात आले.दर वर्षी वैविध्यपूर्ण देखावे करणाऱ्या साने गुरुजी तरुण मंडळाने यंदा ८१व्या वर्षात पदार्पण केले आहे. श्रीराम मंदिर प्रतिकृतीसाठी खड्डेविरहित मांडव उभारण्यात आला असून, मंदिराचा बहुतांश भाग लाकडापासून तयार करण्यात आला आहे. आवश्यक तिथेच फायबरचा वापर करण्यात आला आहे, अशी माहिती साने गुरुजी तरुण मंडळाचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली.श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाईच्या मूर्ती, तसेच वेगवेगळ्या फ्रेम्स या गोष्टी मंदिरात आहेत. श्रीराम मंदिराच्या बाहेर प्रभू श्रीरामांची भव्य मूर्ती उभी करण्यात आली आहे. मुंबईतील कलाकार मिथिलेशकुमार आणि त्यांचे बंधू नीतेशकुमार श्राप यांनी हे भव्य श्रीराम मंदिर साकारले आहे.‘पुण्यामध्ये प्रथमच अशा पद्धतीने श्रीराम मंदिराची भव्यदिव्य प्रतिकृती साकारली जात आहे. प्रभू रामांच्या वैविध्यपूर्ण मूर्ती, रामचंद्रांवर आधारित गीत-संगीत, भजन-कीर्तन नि कलावंतांनी साकारलेल्या निरनिराळ्या कलाकृती असे श्रीराममय वातावरण या निमित्ताने  असणार आहे. पुण्यातील काही चित्रकार, तसेच मूर्तिकार मंडळी एका दिवशी संध्याकाळी एकत्र येतील आणि सामूहिकपणे प्रभू श्रीराम या विषयावर चित्रे चितारणार आहेत, तसेच मूर्ती घडवणार आहेत,’ असेही धीरज घाटे यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
बाळासाहेब सोळांकुरे पाटील About 18 Days ago
जय श्री राम ! खुपच छान कलाकृती,,,, साक्षात अयोध्या नगरी,,,, जय श्री राम!
0
0

Select Language
Share Link
 
Search